ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वर्ध्यात बहुजन समाज पार्टी चे वर्धा जिल्हा अध्यक्ष अनोमदर्शी भैसारे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये सर्वत्र लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 106 वी जयंती उत्साहात साजरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा : बहुजन समाज पार्टी, जिल्हा वर्धा यांच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 106 व्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास बहुजन समाजातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहुन सहभाग दिला आहे.

या निमित्ताने सकाळी 10.30 ते 11.30 या वेळेत गोंड प्लॉट येथील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे पुतळा येथे अभिवादन करण्यात येणार आले . तसेच सायंकाळी 4.00 वाजता अण्णाभाऊ साठे चौक, सुकळी बाई, वर्धा येथे दुसऱ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी समाजातील वंचित, शोषित आणि कष्टकरी वर्गाच्या न्यायासाठी आपल्या साहित्य व शाहिरीच्या माध्यमातून संघर्ष केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी सामाजिक परिवर्तनाची चळवळ अधिक बळकट केली. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी आणि सामाजिक समतेचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचे बहुजन समाज पार्टीच्या जिल्हा अध्यक्ष अनोमदर्शी भैसारे व विदर्भ महिला संघटिका विद्या ताई राइकवार यांच्या वतीने सांगण्यात आले आहे.

यावेळी सर्व बहुजन समाज बांधवांनी उपस्थित राहून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन केले , बहुजन समाज पार्टी, जिल्हा वर्धा च्या वतीने सर्वत्र लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची 106वि जयंती साजरी करण्यात आली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये