कुख्यात गुंड / दारुविक्रेता इसमावर एम.पी.डी.ए. कायद्यान्वये कारवाई

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
पोलीस स्टेशन, आयी हद्दीतील कुख्यात गुंड / दारुविक्रेता शुभम संजय माने वय २७ वर्षे रा. हनुमान वार्ड, आयी पाचे विरुध्द पोलीस स्टेशन, आवर्वोचे अभिलेखावर सन २०१७ पासुन शरीरा विरुध्द तसेच महाराष्ट्र दारुबंदी कायद्या अंतर्गत एकुण २५ गुन्हे नोंद आहे. ज्यामध्ये अवैधरित्या घातक शस्त्र बाळगणे, अपहरण करणे, शस्त्र बाळगुन गंभीर दुखापत करणे, खुनाचा प्रयत्न करणे, अश्लिल शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी देणे, अवैद्य अवैद्य दारुची विक्री करणे, अशा प्रकारचे गुन्हे नोंद आहेत. त्या पैकी ०८ गुन्हे न्यायप्रविष्ठ आहेत. मागील ०८ ते ०९ वर्षापासुन स्थानबध्द ईसम नामे शुभम संजय माने रा. हनुमान वार्ड आवी याने पोलीस स्टेशन, आवी परीसरात जनसामान्यांच्या मनामध्ये स्वतःची प्रचंड दहशत निर्माण केली होती. त्याच्या दहशतीमुळे अनेक पिडीत त्याचे विरुध्द पोलीस स्टेशनला तक्रार देण्यास सुध्दा धजावत नव्हते. त्यामुळे परीसरातील सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था भंग होवून सार्वजनीक जिवन विस्कळीत झाले होते. शुभम संजय माने याच्या कृत्यांमुळे पोलीस स्टेशन, आवी अंतर्गत येणाऱ्या परीसरामध्ये सार्वजनीक शांतता व सुव्यवस्था भंग होत होत असल्याने त्याचे व त्याचे गुन्हेगारी गतिवीधी चांबत नसल्याने त्याचे विरुध्द सन २०२२ मध्ये कलम ९३ महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम १९४९ तसेब कलम ११०(ई) फौजदारी प्रकोंया संहीता अन्वये प्रतिबंधक कार्यवाही करण्यात आली होती. परंतु अशा प्रतीबंधक कार्यवाहीस सुध्दा तो जुमानत नसल्याचे व सतत गुन्हे करीत असल्याचे निदर्शनास आले.
त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक, आवी यांनी महाराष्ट्र झोपडपट्टीदादा, हाचभट्टीवाले, औषधीद्रव्ये विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, रेती माफीया व जिवनावश्यक वस्तुचा काळाबाजार करणारे यांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबत अधिनियम १९८१ (सुधारणा २०१५) अन्वये स्थानबध्द करण्याबाबतचा प्रस्ताव मा. अनुराग जैन, पोलीस अधीक्षक, वर्धा यांचे मार्फतीने मा. जिल्हादंडाधिकारी तथा जिहाधिकारी, वर्धा मा. नरेन्द्र फुलझेले यांना सादर केला होता. त्या अनुषंगाने मा. जिल्हादंडाधिकारी तथा जिहाधिकारी, वर्धा यांनी दिनांक २९ मे २०२५ रोजी स्थानबध्द आदेश जारी करुन त्यास नागपुर मध्यवर्ती कारागृह, नागपुर येथे स्थानबध्द करण्याचे आदेश पारीत करण्यात आलेले होते. स्थानबध्द आदेशांन्वये त्यास नागपुर मध्यवती कारागृह, नागपुर येथे स्थानबध्द करण्यात आलेले आहे.
आगामी होणाऱ्या ग्राम पंचायत, जिल्हा परीषद निवडणुका निर्भीड व शांततापूर्ण वातावरणात पार पडण्याचा उद्देशाने अशा अवैधरीत्या दारुविक्रेत्यांवर, तसेच समाजातील गुंड प्रवृत्तीच्या धोकादायक असणाऱ्या व्यक्तीवर एम.पी.डी.ए. कायद्या अंतर्गत कठोर कार्यवाहीचे पुनश्चः संकेत मा. जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी, वर्धा श्री. नरेन्द्र फुलझेले, तसेच मा. पोलीस अधीक्षक, वर्धा श्री. अनुराग जैन, यांनी दिलेले आहे.
सन २०२४ मध्ये वर्चा जिल्हयातील एकुण १९ दारुविक्रेते आणि गुंड प्रवृत्तीच्या गुन्हेगारांना एम.पी.डी.ए. कायद्या अंतर्गत विविध कारागृहामध्ये स्थानबध्द करण्यात आलेले आहेत तसेच सन २०२५ मध्ये अद्याप पावेतो ०९ अवैध दारुविक्रेते तसेच गुंड प्रवृत्तीच्या धोकादायक व्यक्तींना विविध कारागृहामध्ये स्थानबध्द करण्यात आले आहे.
सदरची कार्यवाही ही मा. श्री. अनुराग जैन, पोलीस अधीक्षक, वर्धा, डॉ. श्री. सागर कवडे, अपर पोलीस अधीक्षक, वर्धा, श्री. डी. सी. खंडेराव, उपविभागीय पोलीस अधिकारी, आर्वी, पो.नि. विनोद चौधरी, स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा यांचे मार्गदर्शनात पो.नि. सतिश डेहणकर, पोलीस स्टेशन, आर्वी पोलीस अंमलदार अमोल आत्राम, आशिष महेशगौरी स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा, पोलीस अंमलदार विनोद मस्के पोलीस स्टेशन, आर्थी यांनी केली आहे.