कृषी कंपन्यांनी राबविली पशु लसीकरण मोहीम
शेतकऱ्यांना मार्गदर्शन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.अविनाश नागदेवे
सेवाग्राम नजिकच्या मदनी (दिंदोडा) येथे बजाज कृषी महाविद्यालय पिपरी वर्धा येथे शिक्षण घेत असलेल्या कृषी कन्यांनी पशु लसीकरण मोहीम दि. ५ आगस्ट २०२३ रोजी राबविण्यात आली.
या प्रसंगी कृषी कन्या पुजा बघेल. साक्षी लाडेकर.प्रणाली पिंपळापुरे, शितल रेहकवार, खुषी उपाध्याय, हिमानी पाणबुडे,सपना वरघने आदींनी पशुवैद्यकीय डॉ. प्रदीप थुल यांच्या मदतीने शंभर जनावरांना L.S.O या रोगाचे लसीकरण केले. यात पन्नास गाई, चाळीस बैल, दहा पगार, कालवडी, आदि शंभर जनावरांना लंप्पी रोगासाठी LSO लसीकरण यशस्वीरीत्या देण्यात आले. यामध्ये ग्रामस्थांनी उत्तम प्रतिसाद दिला. तसेच गोठयात स्वच्छता, खेळतो हवा, पिण्याचे स्वच्छ पाण्याचे टाके, लसीकरणाचे महत्त्व, अस्वच्छतेमुळे उद्भवणारे रोग व होणारे दुष्परिणाम शेतकऱ्यांना पटवून दिले. पावसाळा शेती व पशुपालन व्यवसाया करीता अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे पावसामध्ये पशूंचे शास्त्र युक्त संगोपन करणे गरजेचे असते. संतुलित आहार पुरविणे. प्रतिकुल वातावरणात आवश्यक निवारा न दिल्यास तसेच कीटकापासून संरक्षण न केल्यास असी जणांवर विविध संसर्गजन्य आजारांना बळी पडू शकतात.
असे या प्रसंगी मार्गदर्शन करण्यात आले.या वेळी बजाज महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. के. सोनटक्के. कार्यक्रम समन्वय डॉ. रविराज उदासी. कार्य अधिकारी प्रविण चव्हाण. डॉ. अर्चना अंबुले.विषय तज्ञ डॉ. दिपक मोहाळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम राबविण्यात आला.