ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

घरफोडी करणारे आरोपी निष्पन्न

सोन्या, चांदीचे दागिण्यासह एकुण ६ लाख ५७ हजारावर मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

पोलीस ठाणे, वर्धा (शहर) येथे फिर्यादी नामे सौ. रोमा अरूणराव पटले, वय ४१ वर्षे, रा. वेद ले आउट व्हिआयपी रोड, वर्धा यांनी दि. ०६/०२/२०२६ रोजी येवून तक्रार दिली कि, ते त्यांचे परीवारासह दिनांक ०४/०२/२६ ते दिनांक ०५/०२/२६ रोजी बाहेरगावी गेले असता त्यांचे घरात कोनीतरी अज्ञात चोरट्याने घराचे मुख्य दाराचे लॉक तोडुन घरातील ठेवुन असेलेले सोन्या, चांदीचे दागिने असा एकुण ३,४४,०००/- रूपये चा मुद्देमाल चोरून नेला अश्या तकारी वरून अप. क्र. ११५/२०२६ कलम ३०५ (अ), ३३१(३), ३३१ (४) वि.एन. एस. २०२३ अन्वये गुन्हा नोंद करून तपासावर होता.

सदर गुन्हयाचा स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा कडुन समांतर तपास करीत असतांना तांत्रीक पध्दतीचा वापर करुन मिळालेल्या माहीतीचे आधारे रेकार्ड वरील सन्हाईत गुन्हेगारांबाबत माहीती प्राप्त करीत असता जिल्हा चंद्रपुर येथे राहणारा अट्टल घरफोडी करणारा आरोपी नामे आशिष श्रीनिवास रेड्डीमल्ला, वय २६ वर्षे रा. रयतवारी कॉलनी बायपास रोड, चंद्रपुर जिल्हा चंद्रपुर याने सदरचा गुन्हा केला असल्याबाबत खात्रीशीर माहीती प्राप्त झाल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे दोन पथक तयार करून आरोपीचे शोध कामी जिल्हा चंद्रपुर येथे जावुन आरोपीचा कसोशीने शोध घेवुन त्यास कामगार चौक, बाबुपेठ चंद्रपुर परीसरातुन ताब्यात घेवुन त्यास तपास कौशल्याचा वापर करून गुन्हयासंबंधाने विचारपुस केली असता त्याने सदरची चोरी ही ऑनलाईन बनएक्स या अॅपव्दारे जुगारामध्ये हारलेल्या पैश्याची उधारी देण्याकरीता केल्याची कबुली देवुन त्याने चोरी केलेले सोन्या, चांदीचे दागिने हे त्याने चंद्रपुर येथील सराफा लाईन परीसरातील सराफा कारागीर यास विकी केल्याचे सांगितल्याने आरोपीचे ताब्यातुन १) एक पिवळया धातुचा ४८ ग्रॅम ८५० मिलीग्रॅम वजनाचा लगड कि. ६,४३,५९८/- रूपये, २) दोन जोड पांढऱ्या धातुच्या ५१ ग्रॅम ८५० मिलीग्रॅम वजनाची पायल कि. ६,६००/- रूपये, ३) एक विवो कंम्पनीचा अॅन्ड्रॉईड मोबा. कि. ७,०००/- रूपये असा एकुण ६,५७,१९८/- रूपये वा संपुर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन आरोपीस पुढील तपासकामी पो. स्टे. वर्धा (शहर) यांचे ताब्यात देण्यात आले आहे.

सदर गुन्हयातील आरोपी हा उच्व शिक्षीत असुन तो सध्या चंद्रपुर येथे डिझाईनींग इन मेक्ॉनिक्स या विषयात एम.टेक करीत असुन आरोपीस ऑनलाईन अॅपव्दारे लागलेल्या जुगाराच्या व्यसनामुळे तो घरफोडी करीत असल्याचे त्याने सांगितले.

सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री. सौरभकुमार अग्रवाल, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. सदाशिव वाघमारे, यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक विनोद चौधरी, पोउपनि विजयसिंग गोमलाडू, पोलीस अंमलदार चंदकांत बरगे, सचिन इंगोले, भुषन निघोट, प्रमोद पिसे, अमोल नगराळे, मंगेश चावरे, अरविंद इंगोले, राहुल अधवाल, गोविंद मुंडे, स्मिता महाजन सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा, वर्षा यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये