ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जनावरे कत्तलीसाठी नेणारे आरोपीं अटकेत

१२ बैल जातीचे जनावरे आणि वाहनाची किंमत असा २२ लाखांवर मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. सुधाकर श्रीरामे

नागभीड पोलीस स्टेशन हद्दीत गुप्त माहितीचे आधारे रेल्वे क्रसिंग जवळ वाहनाची तपासणी केली असता महिंद्रा पीक अप एम ए च ३४ बी झेड १४४१, महिंद्रा पीक अप एम ए च ३६ ए ए २८८१, टाटा योद्धा एम ए च ३६ ए ए या तिन्ही वाहनातून १२ बैल जातीचे जनावरे आणि वाहनाची किंमत असा २२ लाख २०,०००/रुपये मुद्देमाल जप्त करण्यात आला.

 यावेळी अस्कर सय्यद अली ४२ ब्रम्हपुरी, देविदास नेवारे ४० सुकडी साकोली, धनराज बदवाई क ४० रमापाप डा, साकोली, तोशिक पठाण २२ राम पाप डा यांना वाहनात बैल जनावरे दाटी ने कोंबून, निदयातेने छळ करून कत्तली करिता नेत असल्याचे मिळून आल्याने सदर गोवंशीय जनावरांना तपासणी करून सुरक्षेच्या दृष्टीने गो शाळेत दाखल करण्यात आले.

यावेळी ठाणेदार राठोड साहेब यांचे मार्गद्शनाखाली स पो नी दिलीप पोटभरे, अजित शेंडे, रोहित तुमासरे, गजानन मडावी याने मदत केली. गुन्हा दाखल करून कार्यवाही सुरू आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये