ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सोमय्या पॉलिटेक्निक येथे विजयादशमी उत्साहात साजरा

कार्यक्रमाला सर्व विभाग प्रमुख आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते

चांदा ब्लास्ट

महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सोमय्या पॉलीटेक्रीक कॉलेज विजयादशमी उत्सव साजरा करण्यात आला, या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष पी.एस.आंबटकर, पियूष आंबटकर, अंकिता पि. आंबटकर, प्राचार्य जमीर शेख, प्राचार्य दीपक मस्के, रजिस्टर बिसन सर उपस्थित होते.

विजयादशमीच्या पर्वावर मेकॅनिकल विभागातील वर्कशॉपमधील सर्व साहित्यांची पूजा – अर्चना करण्यात आली तसेच इलेकट्रीकल विभाग, इलेक्ट्रॉनिक विभाग, सिव्हिल विभाग, मायनिग विभाग आणि संगणक विभाग मधील सर्व लॅबच्या साहित्याची पूजा करून प्रसाद वितरण करण्यात आला.

तसेच विजयादशमी पर्वाची माहिती देत नऊ दिवसाचा नवरात्र उत्सव पूर्ण होतो आणि मग दारी येतो दसरा, देवीने महिषासुराशी युद्ध करून त्याला मारले तसेच तोच हा दिवस प्रभू रामचंद्रांनी रावणाचा वध केला तो दिवस म्हणजे दसरा होय, अज्ञानावर ज्ञानाने, शत्रूवर पराक्रमाने विजय मिळविण्याचा आनंद, समाधान, यश, कीर्ती प्राप्त करायचे.

तसेच राम म्हणजे अतिशय अनंद देणारा आणि असुर रावण दुसरे कोणी नसून ज्ञान व शक्तीमुळे गर्वमदान्वित झालेली साधकाची अहंकारी वृत्ती होय, विजयादशमीच्या सर्वाना शुभेच्छा देत संस्थेचे अध्यक्ष  पी. एस. आंबटकर यांनी आपले मत वक्त केले.

या कार्यक्रमाला सर्व विभाग प्रमुख आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये