Sudarshan Nimkar
ताज्या घडामोडी

रितीका बोस करणार शालेय राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत चंद्रपूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व

चांदा ब्लास्ट :
अतुल कोल्हे भद्रावती :-
क्रीडा संचालनालय पुणे व जिल्हा क्रीडा कार्यालय चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने चंद्रपूरच्या जिल्हा क्रीडा संकुल येथे आयोजित विभागीयस्तरीय बॉक्सिंग या क्रीडा प्रकारात स्थानिक विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय भद्रावतीची खेळाडू उत्तम खेळाचे कौशल्य दाखविले त्यामुळे तिची राज्य स्तरीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे. राज्य स्तरीय स्पर्धेत ती चंद्रपूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत. विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी १९ वर्ष वयोगट खालील बॉक्सिंग या क्रीडा प्रकारात विभागीयस्तरावर यश संपादन केले, कु. रितीका समीर बोस या खेळाडूंनी उत्तम क्रीडा कौशल्य दाखवत तिची राज्य स्तरीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे. खेळाडूंनी या यशाचे श्रेय महाविद्यालयाला दिले आहे. महाविद्यालयातील क्रीडा व शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख प्राध्यापिका संगीता आर. बांबोडे यांनी खेळाडूंना प्रशिक्षण दिले. खेळाडूंच्या या यशाबद्दल विवेकानंद ज्ञानपीठ (कॉन्व्हेंट) वरोराचे अध्यक्ष पुरुषोत्तम स्वान, उपाध्यक्ष जंयताभाऊ टेंमुर्डे, सचिव अमन टेंमुर्डे, विवेकानंद महाविद्यालय भद्रावती चे प्राचार्य डॉ. एन.जी. उमाटे, उपप्राचार्य डॉ. सुधीर आस्टुनकर, प्रा. डॉ. टोंगे, प्रा. डॉ. ज्योती राखुंडे, प्रा. डॉ. तितरे, प्रा. डॉ. घुमे, प्रा. मोहित सावे, प्रा. मालेकर, प्रा. कापगाते,प्रा. लांबट तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी राज्य स्तरीय स्पर्धेकरता निवड झालेल्या खेळाडूंचे अभिनंदन व कौतुक केले आणि पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये