Sudarshan Nimkar
ताज्या घडामोडी

रिलिजियस वर्ल्ड पिस फोरम द्वारा बुद्ध लेणी ची देखरेख होणार

चांदा ब्लास्ट

अतुल कोल्हे भद्रावती:-
धम्म चक्र प्रवर्तन दिनाच्या पूर्व संध्येला आयोजित धम्म सोहळ्याच्या कार्यक्रमात बौद्ध धम्माचे धर्म गुरु पूज्य भदन्त नागार्जुन शुरेई ससाईजी यांनी एतिहासिक बौद्ध लेणी भद्रावती मध्ये लेणीच्या टोकावर असलेली तथागत भगवान गौतम बुद्धांची उभी मूर्ती चा एक हात तुटलेला आहे याची खंत व्यक्त केली व जाहीर पने जनसमुदाया समोर नाना देवगडे व सहकारी यांना ताबळतोब हे ठीक करायला सांगीतले होते . त्याच अनुषंगाणे पूज्य भदन्त नागार्जुन शुरेई ससाईजी यांच्या दिशानिर्देशानुसार भद्रावती रिलिजियस वर्ल्ड पिंस फोरम द्वारे फोरम च्या सभासदांनी बौद्ध मूर्ती ची पाहणी करत संबंधीतांशी चर्चा करून लवकरात – लवकर दुरुस्ती करून त्या जागेवर कटघरा , शेड व शुद्ध पेय जल ची वेवस्था करण्याचा निर्णय केला आहे.तसी माहिती पुनर्वसन विभागाला दिल्या जाईल .
पूज्य भदन्त नागार्जुन शुरेई ससाईजी यांच्या निर्देशानुसार बौद्ध लेणीला पर्यटन स्थळाचा दर्जा प्राप्त व्हावा या करिता ‘भद्रावती रिलिजियस वर्ल्ड पिंस फोरम “द्वारे केंद्र व राज्य शासनाला पत्र व्यव्हार चालू करण्यात येणार आहे. तसेच सदर फोरम द्वारे येत्या काळात अंतराष्ट्रीय धम्म –परिषदेचे आयोजन सुद्धा करण्यात येणार आहे . करिता सदर फोरम द्वारे आपल्या राज्यातिल प्रत्तेक जिल्ह्यातून पाच प्रतिनिधी व संपूर्ण चंद्रपूर जिल्हामधून सभासद तयार करण्यात येतील . एतिहासिक बौद्ध लेणी भद्रावती येथे नियोजन व पाहणी करण्याकरिता फोरम चे सभासद नाना देवगडे,अनमोल कोल्हटकर ,शंकर आसमपल्लीवार , विजय गायकवाड ,बिपिन देवगडे, वैभव पाटील,आदर्श मेश्राम , पंकज शेडे , प्रीतिश रामटेके ,सागर कोल्हटकर , अनिरुद्ध उपरे ,सुरज भेले, भाग्यश्री शेंडे ,मानसी देवगडे,कल्पना देवगडे, सुवर्णा कोल्हटकर , प्रेमिला देवगडे व सहकारी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये