Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

माझी माती माझा देश कलश यात्रा उपक्रमासाठी ताडाळी येथील विश्वास घडसे यांची निवड

दिल्ली येथील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या सोहळ्यात होणार सहभागी

चांदा ब्लास्ट

निस्वार्थ सामाजिक कार्य करत, ताडाळी गाव स्वच्छता व हागणदारीमुक्त करण्यात योगदान देण्यापासून तर ताडाळी गाव स्वच्छता दुत तथा कोविड काळात आरोग्य दुत असे गाव व प्रशासन कडून सन्मानपूर्वक वेगळं अस्तित्व निर्माण करणारा युवक विश्वास. नुकताच बि -फार्मसी चे शिक्षण पूर्ण केले असुन,भवानजिभाई महाविद्यालय आणि जनता विद्यालय ताडाळी येथील माजी विद्यार्थी तथा

नेहरू युवा केंद्र, चंद्रपूर स्वयंसेवक विश्वास धिरज घडसे यांची स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त ‘माझी माती माझा देश’ हा केंद्र सरकारचा अमृत कलश उपक्रम दिल्ली येथे होत आहे. सदर कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थिती मध्ये होत असून या कार्यक्रमात चंद्रपूर शहर महानगपालिकेचे प्रतिनिधित्व करण्यासाठी जिल्हा प्रशासन अंतर्गत विश्वास घडसे यांची निवड करण्यात आली असून त्याचे सर्वत्र कौतुक केल्या जात आहे.

 दिनांक 18 ऑक्टोंबर रोजीअमृत कलश एकत्रीकरण सोहळ्याप्रसंगी जिल्हाधिकारी विनय गौडा,आयुक्त विपीन पालीवाल यांच्या हस्ते हुतात्मा स्मारक येथे विश्वास घडसे यांना महानगर पालिकेचा कलश सुपुर्त करण्यात आला. याप्रसंगी उपायुक्त मंगेश खवले,अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, जिल्हा सहायक आयुक्त अजितकुमार डोके,बल्लारपुर नगर परिषद मुख्याधिकारी विशाल वाघ,सर्व नगर परिषद / नगर पंचायत यांचे मुख्याधिकारी,शासकीय तंत्रनिकेतन विद्यालयाचे प्राचार्य,विविध महाविद्यालयाचे विद्यार्थी तसेच मनपा अधिकारी कर्मचारी उपस्थीत होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये