ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महात्मा गांधी विद्यालयात डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांना अभिवादन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

महात्मा गांधी विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय, गडचांदूर येथे माजी राष्ट्रपती स्व डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांची जयंती साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी प्राचार्या स्मिताताई चिताडे होत्या, प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्याध्यापक अनिल काकडे,उपप्राचार्य प्रफुल्ल माहुरे,पर्यवेक्षक बी के हस्ते होते.

सर्वप्रथम डॉ. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. प्रा. नितीन वाढई यांनी डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जीवनावर प्रकाश टाकला, संचालन देवराव जाधव यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा नरेंद्र हेपट यांनी केले, याप्रसंगी प्रा.नंदाताई भोयर तथा इतर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये