ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शरदराव पवार महाविद्यालयाचे विद्यार्थी मल्लखांब खेळात चमकले

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली द्वारे आयोजित आंतर महाविद्यालयीन मल्लखांब स्पर्धेचे आयोजन आनंद निकेतन महाविद्यालय वरोरा येथे करण्यात आले होते.

या मल्लखांब स्पर्धेत पुरुष गटात शरदराव पवार महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी तृतीय क्रमांक प्राप्त केला. महाविद्यालयाचे क्रीडा व शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख डॉ. सत्येंद्र सिंह यांच्या मार्गदर्शनाअंतर्गत या विद्यार्थ्यांनी हे यश संपादन केले आहे.

शरदराव पवार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय कुमार सिंग, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी या खेळाडूचे अभिनंदन केले आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये