ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शहर व परिसरात सुरू असलेल्या अवैद्य धंदे बंद करण्यासाठी उपोषणाला बसलेले सुरज हनुमंते यांनी आश्वासनानंतर उपोषण सोडले 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

देऊळगाव राजा व सिंदखेडराजा तालुक्यातील अवैध धंदे सुरू असून गल्लीबोळ्यांमध्ये ठिकठिकाणी अवैध्य धंद्याची दुकाने थाटात वसलेली आहे त्याच धंद्यांविरोधात भाजपाचे सुरज हनुमंते यांनी आवाज उठवून उपोषणासाठी बसलेले होते, त्यांची मागणी होती की सणासुदीच्या गणपती, दुर्गा उत्सव व दिवाळीच्या काळामध्ये महिला लहान बालक मुली ह्या रस्त्याने जात असताना ठिकठिकाणी अवैध्य धंद्याची दुकाने आहेत त्या व्यक्ती धंद्यांच्या ठिकाणी दारू पिलेले लोक आयोध्या धंद्यासाठी खेळासाठी येतात त्याच कारणातून महिलांना बालकांना मुलींना येणारा जाणाऱ्यांना किंवा त्या गल्लीतील लोकांना त्रास होत आहे.

याच विषयाला पकडून सुरज हनुमंते यांनी दिनांक 13 सप्टेंबर रोजी बस स्टॅन्ड चौक देऊळगाव राजा येथे उपोषणाला बसलेले होते त्याच दिवशी संध्याकाळी पोलीस निरीक्षक संतोष महल्ले व डीवायएसपी मनीषा कदम यांनी उपोषण स्थळाला भेट देऊन सुरज हनुमंते व त्यांच्यासोबत च्या कार्यकर्त्यांना आश्वासन देऊन उपोषणाची सांगता केली आणि दारू व अवैध धंद्यांवर आम्ही तात्काळ लवकरात लवकर कारवाई करू आणि अवैध दारू आणि अवैध्य धंदे हे लवकरात लवकर बंद करण्याचे आदेश काढू या आश्वासनानंतर सुरज हनुमंते यांनी पीआय संतोष महाले व डीवायएसपी मनीषा कदम यांच्या शब्दाला मान देऊन उपोषणाची सांगता केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये