आर्वी उपविभागाच्या दारूबंदी पथकाकडून दोन वेगवेगळ्या ठिकाणी धाडी; २ लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त
वर्धा पोलिसांची मोठी कारवाई

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
मा. पोलीस अधीक्षक साहेब वर्धा यांनी जिल्ह्यात सुरू केलेल्या ‘विशेष दारूबंदी मोहिमे’ अंतर्गत दारूबंदी पथक, आर्वी उपविभागाने धडक कारवाई करत दिनांक १७/०६/२०२६ रोजी दोन वेगवेगळ्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत धाडी टाकून एकूण २,०९,९५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पहिली कारवाई: पो.स्टे. आष्टी हद्दीत १.१७ लाखांचा मुद्देमाल जप्त आर्वी उपविभागाच्या दारूबंदी पथकाला मिळालेल्या माहितीच्या आधारे पो.स्टे. आष्टी हद्दीतील मौजा आष्टी शिवारामध्ये आरोपी मुकुंद सुरजुसे (रा. आष्टी) याच्या बेकायदेशीर दारू भट्टीवर रेड करण्यात आली. या कारवाईत ३५ लोखंडी पिंप ज्यामध्ये ५२५ लिटर मोहा रसायन सडवा, गावठी हातभट्टी गाळण्यासाठी लागणारे साहित्य. एकूण जप्त किंमतः १,१७,८५०/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाः. या प्रकरणी आरोपीविरुद्ध पो.स्टे. तळेगाव (शामजी पंत) येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
दुसऱ्या एका कारवाईत, पो.स्टे. तळेगाव (शा.पं.) हद्दीतील मौजा काकडदरा शिवारामध्ये आरोपी भरत सिंग उर्फ गोऱ्यासिंग बावरी (रा. तळेगाव) याच्या दारू भट्टीवर पथकाने छापा टाकला. या कारवाईत खालील मुद्देमाल जप्त करून आरोपीला ताब्यात घेण्यात आले या कारवाईत ०४ ड्रम ज्यामध्ये ४०० लिटर मोहा रसायन सडवा होता. गावठी हातभट्टी गाळण्यासाठी लागणारे साहित्य. एकूण जप्त किंमत: ९२,१००/- रुपये. याप्रकरणी देखील आरोपीविरुद्ध पो.स्टे. तळेगाव (शा.पं.) येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मार्गदर्शन व कारवाई करणारे पोलीस पथक सदरची धडक कारवाई मा. श्री. सौरभ कुमार अग्रवाल, पोलीस अधीक्षक, वर्धा आणि श्री. सदाशिव वाघमारे, अपर पोलीस अधीक्षक, वर्धा यांच्या मार्गदर्शनाखाली दारूबंदी पथक, आर्वी उपविभागाच्या सपोनि पद्माकर मुंडे पोउपनि कल्पेश मगरे, पो.हवा. राजेश पाचरे, पो.शि. प्रतिक नगराळे मपोशि शिल्पा राऊत, चालक पो.शि. सुरज भाणगे यांनी केली.
(आशिष चिलांगे) सहायक जनसंपर्क अधिकारी, पोलिस अधीक्षक कार्यालय वर्धा.



