वर्धा रेल्वे पोलीसांनी लखनौ चेन्नई एक्सप्रेस मध्ये दोन महिलांकडून दारुसाठा जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
दिनांक 16 जून 2026 रोजी वर्धा रेल्वे पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी आपली ड्युटी रेल्वे स्टेशन बल्लारशा येथे करीत असताना त्यांना प्लाॅट फॉर्म नंबर 1 वर ट्रेन नंबर 1604 लखनौ चेन्नई एक्सप्रेस कोच नंबर S/7 मध्ये दोन महिला चढताना दिसून आल्या त्यामध्ये महिला नंबर 1 कडे दोन वेगवेगळ्या पिशव्या दिसून आल्या आणि दुस-या महिलेकडे सुध्दा दोन वेगवेगळ्या पिशव्या दिसून आल्याने रेल्वे पोलीसांनी त्यांच्या संशयास्पद दिसून आल्याने रेल्वे पोलीसांनी दोन्ही महिलांच्या पिशव्याची तपासणी केली असताना त्यांच्याकडे दोन दोन पिशव्या मध्ये 90 एम एल च्या प्लास्टिक सिलबंद राॅकेट संत्रा देशी दारूच्या 250 नग निपा मिळून आल्यानंतर दुसऱ्या महिलेच्या पिशव्यांची तपासणी केली असताना त्या महिलेच्या पिशव्यांमध्ये रॉकेट देशी दारू संत्रा कंपनीचे 90 मिली चे प्लास्टिक पव्वे 240 नग मिळून आल्याने त्या दोन्ही महिलांना नाव विचारले असताना पहिल्या महिलाचे नाव शहादा शरिफ खान वय 35 वर्ष राहणार कोयवडा तहसील सिरोंचा जिल्हा गडचिरोली दुसऱ्या महिलेचे नाव पदमा रमेश कांबळे वय 45 वर्ष राहणार कोयवडा तहसील सिरोंचा जिल्हा गडचिरोली दोन्ही महिलांना आरोपींना रेल्वे पोलीस स्टेशन वर्धा येथे 17 जून 2026 आणण्यात आले आणि 00/28 मिनिटांनी रेल्वे पोलीस स्टेशन वर्धा येथे सरकार तर्फे फिर्यादी नामें पोलिस शिपाई पंकज भांगे बक्कल नंबर 16 रेल्वे पोलीस स्टेशन वर्धा ड्युटी बल्लारशा कॅम्प पोलिस चौकी यांनी रिपोर्ट तयार करून दिली महिला आरोपी नंबर (1) शहादा शरिफ खान वय 35 वर्ष राहणार तहसील कोयवडा जिल्हा गडचिरोली आरोपी नंबर (2) पदमा रमेश कांबळे वय 45 वर्ष राहणार कोयवडा तहसील सिरोंचा जिल्हा गडचिरोली यांच्या विरुद्ध रेल्वे पोलीस स्टेशन वर्धा येथे अपराध क्रमांक 157/2026 कलम 65(A),66(B) म.दा का दाखल करण्यात आला आहे आणि यावेळी महिला आरोपी कडून मिळालेला माल-आरोपी न 1 कडे तिचे दोन वेगवेगळे बॅग /पिशवी मध्ये 90 ml चे प्लास्टिक सीलबंद रॉकेट संत्रा देशी दारू निपा. एकूण 250 नग प्रती बॉटल किंमत 40 रु प्रमाणे एकूण किंमत 10,000/-रु चा
आरोपी न 2 कडे दोन वेगवेगळे पिशवी/बॅग मध्ये रॉकेट देशी दारु संत्रा कंपनीचे 90 मिली चे प्लास्टिक पवे एकूण 240नग प्रति नग किंमत 40 रु प्रमाणे किंमत. 9,600 /- रु बॅग व पिशवीसह एकूण किंमत 21,150/- रुपये चे मुद्देमालासह जप्त करण्यात आला आहे ही कारवाई रेल्वे पोलीस निरीक्षक विरसेन चंहादे पो स्टाफ ASI वासनिक, WPC किर्ती मिश्रा यांनी केलेली आहे आणि दोन आरोपी महिला यांना सूचनापत्र देण्यात आले आहे.पुढील तपास पोलीस नायक सुखदेव रेल्वे पो.स्टे. वर्धा कॅम्प op बल्लारशा करीत आहे…..



