ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

साठवणीत धान्य कीड नियंत्रणाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

 साठवणुकीदरम्यान धान्याला विविध किडींचा प्रादुर्भाव होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते. यामुळे धान्याची गुणवत्ता खालावते तसेच आर्थिक नुकसानही होते. या पार्श्वभूमीवर समर्थ कॉलेज ऑफ ॲग्रीकल्चर, देऊळगाव राजा येथील कृषिकन्यांनी शेतकऱ्यांना साठवणीत धान्य कीड नियंत्रणाबाबत मार्गदर्शन केले.

यावेळी धान्य साठवणुकीपूर्वी धान्य चांगले वाळविणे, कोठारे व पोती स्वच्छ ठेवणे, साठवलेल्या धान्याची नियमित तपासणी करणे, तसेच किडींचा प्रादुर्भाव दिसून आल्यास योग्य नियंत्रण उपाययोजना करणे याबाबत माहिती देण्यात आली. तसेच धान्य सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक असलेल्या विविध उपायांचे प्रात्यक्षिकही दाखविण्यात आले.

या उपक्रमासाठी रावे इंचार्ज सहाय्यक प्राध्यापक मोहित राजपूत , प्राचार्य डॉ. नितीन मेहेत्रे, उपप्राचार्य देवानंद नागरे तसेच अभ्यासक्रम शिक्षक प्राध्यापक राहुल साळवे यांनी मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमास परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कृषिकन्या तृप्ती मोरे, सृष्टी करडे, अंकिता काळे, गौरी सोळंकी, मयुरी झाडे, प्राजक्ता शेवाळे, सायली माने, माधुरी दुनगहू, अवंती देशमुख,शामल जमदाडे यांनी शेतकऱ्यांना साठवणीत धान्य कीड नियंत्रणाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये