ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

हिंगणघाट पोलिसांनी देशी दारूच्या 19 पेट्या व दोन मोपेड गाड्या कि. 3 लाख 90 हजाराचा मुद्देमाल जप्त 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

पोलीस स्टेशन हिंगणघाट गुन्हे प्रगटीकरण पथकाचे पोलीस अंमलदार हे पोस्ट हिंगणघाट परिसरात रात्रगस्त ड्युटी करीत असताना लक्ष्मण नगरी संत ज्ञानेश्वर वार्ड हिंगणघाट खाली लेआउट मध्ये दोन मोपेड गाड्या संशयितरित्या उभ्या दिसल्या सदर मोपेड गाड्यांची शहानिशा करणे करिता जात असताना मोक्यावरून दोन अज्ञात इसम अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. मोक्यावर पाहणी केली असता 19 खर्ड्याचे बॉक्स ज्यामध्ये भिंगरी कंपनीच्या देशी दारू नी भरलेल्या शीशा मिळून आल्या पंचा समक्ष मोक्यावरून 1) 19 खर्ड्याचे बॉक्समध्ये भिंगरी कंपनीच्या देशी दारू ने भरलेल्या 90ml च्या एकूण 1900 शिषा प्रति शिशी 100/रु प्रमाणे एकूण किंमत 1,90,000/रु 2) एक मेटॅलिक काळ्या रंगाची सुझुकी एसेस मोपेड गाडी क्रमांक mh 32 BB 2948 की. 100,000/रु. 3) एक पांढऱ्या रंगाची टीव्हीएस ज्युपिटर कंपनीची विना नंबरची मोपेड गाडी की. 100,000/रु. असा एकूण जुमला किं. 3,90,000/रु. चा माल जप्त केला.

मोक्यावरून पसार झालेल्या मोपेड गाडीचे चालक-मालक यांचे विरुद्ध केला गुन्हा नोंद केला.सदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधिक्षक श्री. सदाशिव वाघमारे, उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. सुशील कुमार नायक यांचे मार्गदर्शनात, व पोलीस स्टेशन हिंगणघाट येथील पोलीस निरिक्षक श्री. अनिल राउत यांचे आदेशाने डी. बी. पथकाचे पो उप. नि. महेश इटकल,पो.हवा. नरेंद्र डहाके, पो ना. नरेंद्र आरेकर, पो ना. निलेशसिंग सूर्यवंशी पो. शी. संग्राम मुंढे पो शी. रवींद्र पांडे यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये