भरत बिरादार यांची ATMA च्या तालुका सल्लागार समितीच्या अध्यक्षपदी निवड

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे
जिवती :- ATMA अंतर्गत जिवती तालुक्यात महत्त्वपूर्ण घडामोड घडली असून, युवा नेतृत्व म्हणून ओळख असलेले भरत ज्ञानोबा बिरादार यांची (ATMA) आत्माच्या तालुका सल्लागार समिती, जिवतीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे संपूर्ण जिवती तालुक्यातील शेतकरी, कृषी क्षेत्रातील कार्यकर्ते आणि युवा वर्गामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या निवड प्रक्रियेदरम्यान तालुका कृषी अधिकारी माधुरी गावंडे, बीटीएम किशोर चंदनबटवे, भारत चव्हाण, संतोष जाधव, सुमित घुले, शिंदे, दीपक जाधव, कंटू कोटनाके, गेडाम तसेच कृषी विभागातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी समिती सदस्य प्रदीप काळे, विलास कोटरंगे, राजाबाई राहुलवाड, सोनाली गिरी, देवशाला साबूचे, अल्का धुर्वे, रुक्मिणी बिरादार, सगुणा शेळके, जनाबाई राठोड, शिवाजी पल्लेवाड, गंगाधर आत्राम, विठ्ठल राठोड, संदीप राठोड, सोनेराव पेंदोर आदी सदस्य उपस्थित राहून एकमताने निवडीला पाठिंबा दर्शविला.सर्व सदस्यांनी दाखविलेला विश्वास आणि एकमताच्या जोरावर भरत ज्ञानोबा बिरादार यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली.
सामाजिक, कृषी आणि ग्रामीण विकास क्षेत्रात सक्रिय असलेल्या त्यांच्या नेतृत्वामुळे शेतकरी हिताचे प्रश्न, आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा प्रसार आणि कृषी विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.या निवडीमुळे जिवती तालुक्यातील राजकीय व सामाजिक वर्तुळातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, आगामी काळात त्यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी केंद्रित विकासकामांना गती मिळणार असल्याची चर्चा सुरू आहे.



