वाघाचे हल्ल्यात गुराखी ठार घटना आज उघडकीस
गिरगाव परिसरात भीतीचे वातावरण
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. सुधाकर श्रीरामे
नागभिड तालुक्यातील तळोधी वन परिक्षेत्रात येणाऱ्या गिरगाव येथील आत्माराम दसरू बोरकर वय ५० वर्ष हा घरच्या बकऱ्या चरण्यासाठी गिरगाव झुडपी जंगल परिसरात काल १८ जून रोजी गेला होता. त्याची एक बकरी वाघाने पकडली असताना तो शोधण्यासाठी गेला असता ठार मारलेल्या बकरीचा शोध घेत असताना दबा धरून बसलेल्या वाघाने त्याचेवर हल्ला करून ठार केले. घरच्यांनी सायंकाळ झाली मात्र गुराखी बोरकर घरी न आल्याने शोधाशोध केली पण शोध लागला नाही मात्र आज सकाळी गिरगाव येथील लोकांनी शोध घेऊन तपासले असता जंगल परिसरात त्याला वाघाने ठार मारले असल्याचे उघड झाले.
गिरगांव येथील काही व्यक्तींनी वन विभाग व पोलिस स्टेशन तळोधी येथे तक्रार दिल्याने मृतक आत्माराम यांचे घटना स्थळावरून शव उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय नागभिड येथे दाखल केले. पोलिसांनी पंचनामा करून वन विभागाने घटना स्थळावर जाऊन चौकशी सुरू केली आहे. ग्रामीण रुग्णालयात शव विच्छेदन करून कुटुंबीयास वन विभागाच्या वतीने सानुग्रह अनुदान ५००००/ रुपये देण्यात आले असून पत्नी विमल आणि मुलगा यांचेवर दुःखाचा डोंगर कोसळला असला तरी वाघाचे दहशतीत शेतीवर कामे करणाऱ्यास भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.



