ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत जम्बो प्लेसमेंट : उमेदवारांना निवड पत्र प्रदान 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

     ऋषी अगस्त शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था चंद्रपूर येथे अप्रेंटीशीप व रोजगार भरती मेळावा सिपेट सभागृहात संपन्न झाला. यावेळी निवड झालेल्या उमेदवारांना निवड पत्र प्रदान करण्यात आले.

     या संस्थेत सत्र २०२३ ते २०२५ या दरम्यान विविध व्यवसायाचे प्रशिक्षण घेतलेल्या उमेदवारांच्या लेखी परीक्षा व मुलाखती घेतल्यानंतर निवड करण्यात आली. आयसीटीएसएम, मेकॅनिक इलेक्ट्रॉनिक्स, काम्पुटर आपरेटर या ट्रेड च्या ५५ उमेदवारांची जाबील सर्किट इंडिया लि. रांजणगाव पुणे याकरिता निवड झाली तर फिटर, वेल्डर, इलेक्ट्रिशियन या व्यवसायाच्या ३५ उमेदवारांची निवड लायड मेटल्स हेडरी सुरजागड करिता निवड करण्यात आली आहे तर मेकॅनिक डिझेल, मोटर मेकॅनिक, एमएइई आणि ट्रॅक्टर मेकॅनिक या व्यवसायाच्या दहा उमेदवारांची निवड भारत बेंझ या कंपनीसाठी झालेली आहे.

   सदर प्लेसमेंट अभियान संस्थेचे प्राचार्य गजानन राजुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली गटनिदेशक श्री. जितेंद्र टोंगे, हितेश नंदेश्वर , राजु श्रीरामे, बंडोपंत बोढेकर, महेश नाडमवार , अधिक्षक श्री. कंगाले, बीटीआर आय चे श्री. उंबरकर तसेच संबंधित निदेशक सौ. ढेंगेकर, सौ. गराड,सौ. ढाकणे, कु. तोडसाम, कु.साखरकर , श्री. कोडापे , धुळसे, पाईकराव,मारबते , लाखे, वरभे , भोंगळे,पाथरवट, बोढाले आदींनी सहकार्य केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये