सरदार पटेल महाविद्यालयात वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एम. काटकर होते. यावेळी उपप्राचार्य डॉ. स्वप्नील माधमशेट्टीवार, चंद्रपूर प्रदूषण नियंत्रण समितीचे सदस्य डॉ. योगेश दुधपचारे, मेरा युवा भारत, चंद्रपूरचे कार्यक्रम अधिकारी मंगेश दुबे, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा. प्रमोद कुचनकर, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. कुलदीप आर. गोंड, डॉ. उषा खंडाळे, डॉ. पुरुषोत्तम माहोरे, डॉ. निखिल देशमुख, डॉ. वंदना खनके, शारीरिक शिक्षण संचालिका डॉ. पुष्पांजली कांबळे, प्राध्यापकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महाविद्यालयाच्या परिसरात विविध वृक्षांची लागवड करण्यात आली. वृक्षारोपण कार्यक्रमानंतर मार्गदर्शन करताना कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. पी. एम. काटकर यांनी पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी वृक्षांचे महत्त्व स्पष्ट केले. पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपणाबरोबरच लावलेल्या रोपांचे नियमित संगोपन व संवर्धन करणे आवश्यक असल्याची पुष्टी त्यांनी जोडली.
वृक्षारोपणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण होण्यासोबतच सामाजिक जबाबदारीची भावना विकसित होते. महाविद्यालय परिसर हिरवाईने नटविण्यासाठी भविष्यातही अशा उपक्रमांचे सातत्याने आयोजन करण्यात येईल, असा संदेश यावेळी देण्यात आला.
कार्यक्रमात राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. उपस्थित मान्यवर, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या सहभागामुळे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
दरम्यान सर्वोदय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अरविंद पोरेड्डीवार, कार्याध्यक्ष आ. किशोर जोरगेवार, उपाध्यक्ष सुदर्शन निमकर, सगुणा तलांडी, सचिव प्रशांत पोटदुखे, कोषाध्यक्ष संदीप गड्डमवार, सर्वोदय शिक्षण मंडळचे कार्यकारी सदस्य राकेश पटेल, शेख रमजान, सुरेश पोटदुखे, जीनेश पटेल यांनी उपरोक्त उपक्रमाबद्दल शुभेच्छा दिल्यात.



