ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पोंभुर्णा येथे गॅस बचत, तेल बचत खाद्य स्पर्धा उत्साहात संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. विजय वासेकर

भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने पोंभुर्णा येथे गॅस बचत, तेल बचत खाद्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. आधुनिक धावपळीच्या जीवनात सुदृढ आरोग्याची काळजी घेताना कमी खर्चात व पौष्टिक आहार कसा तयार करता येईल, याचा संदेश या स्पर्धेतून देण्यात आला.

स्पर्धेदरम्यान महिलांनी गॅस व तेलाचा कमीत कमी वापर करून विविध खाद्यपदार्थ तयार करण्याचे कौशल्य सादर केले. विशेषतः “नो गॅस, नो ऑइल” संकल्पनेवर आधारित पदार्थांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. विद्या मंगळगिरीवार यांनी इको-फ्रेंडली व पौष्टिक सॅलड तयार करून तेल व गॅस बचतीचा प्रभावी संदेश दिला. त्यांच्या सादरीकरणाचे उपस्थितांनी कौतुक केले.

या स्पर्धेत अनेक महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेत विविध पदार्थांचे प्रदर्शन केले. कार्यक्रमाला भाजपा महिला मोर्चाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती लाभली.

यावेळी अल्का आत्राम (प्रदेश महामंत्री), सुलभा पीपरे (नगराध्यक्ष), पपीता तोडसाम (तालुका महामंत्री), पपीता पोलपोलवार (तालुका महामंत्री), शुभांगी कुत्तारमारे (तालुका महामंत्री), वनिता वाकूडकर (तालुका महामंत्री), माधुरी मोरे, विद्या मंगळगिरीवार, वैशाली वासलवार, शिल्पा नागूलवार, मनीषा थेरे, मंगला सोनटक्के, हंसा मेश्राम, गीता तुम्पल्लीवार तसेच सर्व स्पर्धक महिला उपस्थित होत्या.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये