ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अनु.जाती आरक्षण उपवर्गीकरणासाठी मातंग समाजाचा भव्य मोर्चा

भरीव समतेसाठी आणि न्याय वितरणासाठी तात्काळ उपवर्गीकरण लागू करा - डॉ. अंकुश गोतावळे राज्यसमन्वयक 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे

जिवती :- सकल मातंग समाज जिवती च्या वतीने अनु. जाती आरक्षणाचे उपवर्गीकरण याच शैक्षणिक सत्रात लागू झाले पाहिजे या मागणीसाठी डॉ. अंकुश गोतावळे आणि ऍड दत्तराज गायकवाड यांच्या नेतृत्वात मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. पेरणीचा हंगाम सुरु असताना सुद्धा मोर्चामध्ये लोकांची प्रचंड उपस्तिथी होती, महिलांचा उत्स्फूर्त सहभाग,आक्रोश,पुढाकार हे मोर्चाचे वैशिष्ट्य होते.

       डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार घालून मोर्चाची सुरुवात झाली.शहरातील मुख्य मार्गाने मोर्चा तहसील कार्यालयाकडे रवाना झाला. मोर्चा जसजसा पुढे पुढे जात होता लोकांचा सहभाग आणखीनच वाढत होता. मागील अनेक वर्षात इतका मोठा मोर्चा शहरात झाला नाही अशी चर्चा सर्वच समाजात आणि सोशल मीडियावार सूरु होती. त्यामुळे मोर्चाचे अभिनंदन करावेच लागेल अशा प्रतिक्रिया लोकांच्या तोंडून बाहेर पडत होत्या.

मोर्चा तहसील कार्यालयाजवळ गेल्यावर तेथे मोर्चाचे रूपांतर सभेमध्ये झाले. तेथे प्रतिनिधिक स्वरूपात काही प्रमुख कार्यकर्त्यांची भाषणे झाली त्यानंतर महिलांच्या शिष्टमंडळाने तहसीलदार यांना निवेदन दिले आणि मोर्चाची सांगता करण्यात आली. मोर्चाच्या यशस्वीतेसाठी डॉ अंकुश गोतावळे, ऍड दत्तराज गायकवाड, प्रा. सुग्रीव गोतावळे, अंबादास कांचकटले,विजय गोतावळे,दत्ता तोगरे, भानुदास जाधव,देविदास कांबळे, यादव भालेराव, डॉ चरण केदासे, गजानन गायकवाड,व्यंकटी तोगरे, नवनाथ जांभळे,बालाजी मोरे, शाहीर संभाजी ढगे, गोविंद गायकांबळे यांनी अहोरात्र परिश्रम केले.तर भगवान डुकरे, मारोती मोरे, संभाजी गायकवाड, रणजित सूर्यवंशी,पंढरी गायकवाड,अजय नरहरे, सूर्यकांत कोमले, गोविंद गायकांबळे, प्रभाकर भालेराव साहेब, देविदास बी कांबळे, गोपले, व्यंकटी कोटंबे, दशरथ कुंटेवाड, दीपक गोतावळे, पंडित पवार, शांतकुमार गोरे, मनोहर शिंदे, रणजित कांबळे, रवी कांबळे, पंढरी वाघमारे, दिगंबर कलवले, विशाल गायमुखे, कुंदन आकृपे, माधव आर सूर्यवंशी, डॉ दुर्गावाड, भारत गायकांबळे, बालाजी गायकवाड, रमाकांत जंगपले, इंजि सुनील ढगे, रविकांत कोमले, माधव वाघमारे, उत्तम गायकवाड,आशिष नामवाड, संतोष काकडे,जयंत गोतावळे, संदीप आंदे, बालाजी कांबळे, चंद्रमनी वाघमारे, गजानन कांबळे, नागनाथ जाधव, आनंद गोतावळे यांनी विशेष सहकार्य केले. तसेच गावोगावच्या सर्व समाजबांधवाणी स्वेच्छेने गावातील लोकांची संपूर्ण व्यवस्था करून मोर्चा यशस्वी केला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये