ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

एक वर्षापूर्वी अल्पवयीन मुलीस पळवून नेणाऱ्या आरोपीस शिताफीने ताब्यात

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

 फिर्यादीने पोलीस स्टेशन वडनेर येथे तोंडी रिपोर्ट दिला की, त्यांची अल्पवयीन मुलगी वय अंदाजे 17 वर्षे हिला कोणीतरी अज्ञात इसमाने फूस लावुन पळवून नेले. अशा दि 11/04/2025 ला दिलेल्या फिर्यादीच्या रिपोर्ट वरून पो. स्टे. वडनेर येथे अप क्र.137/2025 कलम 137(2)BNS प्रमाणे गुन्हा नोंद करुन तपासात घेतला. गुन्हयातील पिडीत मुलीचा व आरोपीचा शोध न लागल्याने सदर गुन्हयात कलम 143(4)BNS प्रमाणे वाढ करुन सदरचा गुन्हा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडे वर्ग करण्यात आला होता.

         सदर गुन्ह्याचे तपासात मा. श्री सौरभ कुमार अग्रवाल, पोलीस अधीक्षक वर्धा यांनी दिलेल्या विशेष सूचना व निर्देशाप्रमाणे पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा वर्धा तथा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष, वर्धा यांचे मार्गदर्शनात पथक तयार करण्यात आले.

          सदर गुन्ह्यात खात्रीशीर मुखबिर लावून व तांत्रिक तपास करण्यात आला. त्या अनुषंगाने आरोपीची व पिडीत मुली बाबत संपूर्ण माहिती संकलित करण्यात आली असता आरोपी व पिडीत मुलगी हे मौजा खाखोपुर , प्रयागराज उत्तर प्रदेश येथे राहत असल्याची गुप्त बातमीदाराकडून व तांत्रिक माहिती घेवुन येथे जावुन सापळा रचून गुन्ह्य़ातील आरोपी सौरभ भास्कर गगनाईक वय 22 वर्षे रा.घुग्गूस जि. चंद्रपूर यास सदर गुन्ह्यात रीतसर कायद्याप्रमाणे अटक करून गुन्हातील अल्पवयीन पिडीत मुलगी वय 17 वर्षे हिला ताब्यात घेवुन तिचे पालकांचे स्वाधिन करण्यात आले. सदर गुन्ह्य़ाचा पुढील तपास पो. स्टे. वडनेर करीत आहे.

             सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांचे निर्देशाप्रमाणे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी स्थानिक गुन्हे शाखा तथा, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष, वर्धा यांचे मार्गदर्शनात स.फौ. सुभाष राऊत, दिवाकर परिमळ, पो.हवा.अमर लाखे, नितेश मेश्राम, संजयसिंग सुर्यवंशी, संजय राठोड, चंद्रकांत बुरंगे, नवनाथ मुंडे म.पो.हवा. शबाना शेख, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष, वर्धा तसेच पो.हवा. अक्षय राऊत, गोविंद मुंडे सायबर सेल यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये