Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पकड्डीगडम मुख्यकालव्या पासून पाईप लाईन द्वारे सिंचन सुविधा द्या – आबिद अली  

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

     महाराष्ट्र सिंचन सुधार प्रकल्प अंतर्गत नाबार्ड सहाय्यात राज्यातील 60 प्रकल्पामध्ये पकडी गड्डम प्रकल्पाचा समावेश करण्यात आला असून याकरिता 88 कोटी २३ लाख रुपये निधी अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंजूर झाले मात्र या प्रकल्पातील 17 ते 18 गावापैकी दहा गावे सिंचना पासून केल्या तीन दशकापासून वंचित आहे पकडी गड्डम जलाशय ते इंजापूर पर्यंतमुख्य कालवा झाला असून डोंगरी भागात असल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा झिरपा जमिनीत होऊ पाणी वाया नाल्या ओढयाने वाहून जाते या क्षेत्रातील लाभ क्षेत्रामध्ये 3200 हेक्टरसिंचन क्षमता प्रस्तावित असली तरी प्रत्यक्षात गेल्या 30 वर्षात सिंचन १००० हेक्टरपेक्षा अधिक खरीप व रब्बी हंगामात पाटबंधारे विभागाला यश आले नाही हेच विदारक सत्य असून अनेक शेतकऱ्यांच्या बांधावर पाणीच पोहोचलेले नाही गेल्या 30 वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या या भागातील अनेक लघु कालवे पाठचारी शेतकऱ्यांनी वाहीती खालीआल्याने मोठ्या प्रमाणात कालवे नासघुस झालेले आहेअनेक भागात जमीन चढ-उतार व डोंगरी भाग असल्याने असल्याने अनेक लघु वितरीकेत पाणीपोहोचले नाही यामुळे या भागातील शेतीच्या बांधावर पाणी जात असल्याने व जलाशय डोंगरी भागात व टेकडी भागात असल्यामुळे संपूर्ण लाभ क्षेत्रातील बांधावर पाणी पोहोचण्यासाठी पाईपलाईन योजना प्रास्तावित करावी व या प्रकल्पाच्या 88 कोटी निधीचा शेतकऱ्यांसाठी उपयोग करण्याकरिता उच्चस्तरीय तज्ञ समिती गठित करून त्यांच्यामार्फत कामाचे नियोजन व पाईपलाईनचे काम करण्याबाबतअभ्यास करून आराखडा तयार करण्यात यावा अशी मागणी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याकडून होत असून अंबुजा सिमेंट प्रकल्पाला गेल्या दोन वर्षापासून पाणीपुरवठा बंद असून पर्यायी व्यवस्था कंपनीच्या खदानीमध्ये उपलब्ध असल्याने कंपनीला पाणी न देता पाईपलाईन द्वारे सर्व शेतकऱ्यांच्या बांधावर पाणी पोहोचविण्याचे नियोजन करण्यात यावे.

अशी मागणी उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री अजित दादा पवार व चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासपुरुष सुधिर भाऊ मुनंगटीवार यांच्या प्रयत्नातून आदिवासी भागातील सिंचन क्षमता वाढवण्यासाठी मार्च 2024 मध्ये मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाल्याने या भागातीलअनेक वर्षाचे हरित क्रांतीचे स्वप्न साकार होणार आहे मात्र या निधीचा सदुपयोग होऊन शेतकऱ्यांना बांधावर पाणी पोहोचवण्यासाठी नियोजन होणे आवश्यक आहे याकरिता शासनाने समिती गठीत करूनप्रकल्प आराखडा तयार करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सहसचिव आबिद अली यांनी उपमुख्यमंत्री पालकमंत्री व पाटबंधारे अप्पर सचिव यांना पाठवलेल्या निवेदनातून केली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये