ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भूपेश राखडे यांचा मरणोपरांत अवयव दानाचा संकल्प

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदु गुद्देवार

ब्रम्हपुरी – केंद्र शासनातर्फे आरोग्यदायी मोहिमे नुसार ग्रामीण रुग्णालय ब्रम्हपुरी येथे “आयुष्यमान भव” अभियानाचे दिनांक १३ सप्टेंबर रोजी वैद्यकीय अधीक्षक डॉ. कामडी सर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

या कार्यक्रमात मानवतावादी दृष्टिकोन ठेवून उदात्त हेतूने भूपेश बंडू राखडे रा. कहली या तरुणाने मरनोपरांत अवयव दानाचे प्रण घेतले.या कार्यक्रमात नगरपरिषदेच्या अध्यक्षा रिताताई उराडे, डॉ.खंडाळे,डॉ. जीवने, डॉ. डोकरीमारे,डॉ. नागमोती, डॉ. पटले,डॉ. सुखदेवे डॉ. नाकाडे, समुपदेशक अंबिलडूके मॅडम व कर्मचारी उपस्थित होते.

भूपेश ने.ही. महाविद्यालयाचा विद्यार्थी असून अर्थ कंजरवेशन ऑर्गनायझेशन संस्थेत प्राणी व पर्यावरण संवर्धनासाठी सेवा देत आहे.वडील बंडू राखडे व आई वनिता राखडे यांनी आपल्या मुलाच्या निर्णयाचे कौतुक केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये