ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील विश्वविक्रमात चंद्रपूरच्या विद्यार्थ्यांचा गौरवशाली सहभाग

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर : नागपूर येथे दि. २२ मे २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या “छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील विश्वविक्रम” कार्यक्रमात चंद्रपूरच्या छोटुभाई पटेल हायस्कूलचे शिक्षक व कलाकार सुदर्शन बारापात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत जिल्ह्याचा नावलौकिक वाढविला.

सुदर्शन बारापात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील १२ विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची १२ आकर्षक चित्रे साकारून या विश्वविक्रमात मोलाचे योगदान दिले. विद्यार्थ्यांच्या कलात्मक कौशल्य, मेहनत आणि समर्पणामुळे हा उपक्रम यशस्वी ठरला.

हा भव्य कार्यक्रम सुमन सदाशिव इंगळे फाउंडेशन, नागपूर यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणादायी जीवनकार्याला कला आणि सर्जनशीलतेच्या माध्यमातून अभिवादन करण्यासाठी राज्यभरातील कलाकार, विद्यार्थी आणि शिक्षक सहभागी झाले होते.

कार्यक्रमाला केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री मा. नितीन गडकरी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी त्यांनी सहभागी विद्यार्थी व मार्गदर्शकांचा गौरव करून प्रशस्तीपत्रे प्रदान केली. त्यांच्या हस्ते सन्मान प्राप्त झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सौ. सुनैना इंगळे खाडे, प्रमुख आयोजक, सुमन सदाशिव इंगळे फाउंडेशन, नागपूर यांचे विशेष योगदान लाभले. त्यांच्या प्रयत्नांमुळे हा विश्वविक्रमाचा उपक्रम यशस्वीरीत्या पूर्ण झाला.

या यशाबद्दल शिक्षक व कलाकार सुदर्शन बारापात्रे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत, त्यांच्या कष्ट, जिद्द आणि कलाप्रेमामुळे चंद्रपूर जिल्ह्याला अभिमानास्पद मान मिळाल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांच्या या ऐतिहासिक कामगिरीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

 

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये