ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

श्री साई अभियांत्रिकी महाविद्यालय लोणारा येथील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

शासन निर्णयाप्रमाणे वेतन निश्चित करुन वेतन न मिळत असल्याबाबत आक्रोश

आंदोलनाचा तिसरा दिवस पार पडला 

तालुक्यातील श्री साई अभियांत्रिकी महाविद्यालय लोणारा येथील शिक्षकेत्तर कर्मचारी मागील अनेक वर्षापासून येथे कार्यरत असून अजूनपर्यंत शासन निर्णयाप्रमाणे वेतनश्रेणी निश्चित करुन न देता संस्थेचे व्यवस्थापक यांनी आपल्या मर्जीने थातूर-मातूर वेतन श्रेणी लागू करुन वेतन देत आहे. ह्या संदर्भात मागील अनेक वर्षापासून अर्ज, निवेदन, विनंती केली असता त्यावर अजूनही कोणतीही कार्यवाही कॉलेज व्यवस्थापकांनी केली नाही. त्यामुळे महाविद्यालयातील सर्व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी महाविद्यालयाच्या गेट समोर मागील तीन दिवसांपासून बसुन धरणे आंदोलन सुरु केले आहे. आज (दि.५) आंदोलनाचा तिसरा दिवस होता.

तालुक्यातील श्री. साई अभियांत्रिकी महाविद्यालय, लोणारा ही संस्था डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ या विद्यापिठाशी संलग्नीत असून दिनांक २८/०४/२०२३ पत्र क्र. REF/Affil/७th Pay/२०२३/३९४ नुसार दिनांक २८/०४/२०२३ नुसार सातव्या आयोगानुसार वेतन श्रेणी निश्चित करुन महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना वेतन देण्याविषयी सूचित केले असतांना सूद्धा अजूनपर्यंत महाविद्यालयाकडून कोणतीही कार्यवाही झालेली नाही.

शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी या आंदोलनाच्या निमित्ताने प्रमुख मागण्या केल्या आहेत. यामध्ये, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या नियमानुसार ७व्या वेतन नुसार पगार मिळावा, महागाई भत्ते व ईतर भत्ते नियमानुसार मिळावे, नियमानुसार पदोन्नती करावी, सर्व्हिस बुक वर सर्व नोंदनी चालु पगाराप्रमाणे अपडेट करण्यात याव्या, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी रक्कम नियमाप्रमाणे भरण्यात यावे, नियमा नुसार ग्राज्युईटी देण्यात यावी, पगार परीपत्रक कर्मचारी यांना देण्यात यावी, ओरीजिनल सैलरी स्लीपची सत्यप्रत देण्यात यावी, आदी मागण्यांचा समावेश आहे.

या संदर्भात महाविद्यालय व्यवस्थापन यांना निवेदन देण्यात आले आहे. महाविद्यालय व्यवस्थापन नेमकी काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये