Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कोरपणा तालुका भाजप अध्यक्षपदी संजय मुसळे यांची वर्णी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

कोरपना : येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या कोरपना तालुका अध्यक्षपदी नवीन कार्यकर्त्याची निवड करण्यात आली आहे. भाजपा तालुकाध्यक्ष पदाची निवड नुकतीच जाहीर करण्यात आली. कोरपणा तालुका हा बहुतांश औद्योगिक व आदिवासीबहुल तालुका म्हणून ओळखला जातो. पक्षाची ध्येयधोरण, विद्यमान सरकारच्या सर्व योजना सामान्य जनतेपर्यंत पोहोचल्या पाहिजे. याशिवाय पक्षाची व्याप्ती वाढावी यासाठी कोरपना पंचायत समितीचे माजी सभापती तसेच संजय गांधी निराधार योजनेचे माजी अध्यक्ष तसेच दांडगा लोकसंपर्क असलेले तालुक्यातील नांदा गावचे प्रतिष्ठित नागरिक संजय मुसळे यांच्या नावावर कोअर कमिटीने शिकामोर्तब केले.

पूर्वाश्रमीचे शेतकरी संघटनेचे जुने कार्यकर्ते मागील दशकात त्यांनी भाजप च्या ध्येय धोरणावर विश्वास ठेवत पक्षप्रवेश केला व अल्पावधीतच संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष असताना शेकडो गोरगरीब विधवा परितक्त्या निराधार महिलांना योजनेचा लाभ मिळवून दिला. याशिवाय अनेक योजना त्यांनी तालुक्यामध्ये राबविल्या. शांत व संयमी स्वभावामुळे तालुक्यामध्ये त्यांची चांगली ओळखी निर्माण झाली.

पक्षाच्या अनेक जबाबदाऱ्या त्यांनी यशस्वीरित्या पार पाडल्यामुळे भाजप चंद्रपूर जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा यांनी पत्रकार परिषदेत या निवडीची घोषणा केली. या निवडीचे सर्वत्र स्वागत होत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये