चिखला येथील घटनेची चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी
माजी आमदार डॉ. शशीकांत खेडेकर यांची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
बिबी जवळ असलेल्या चिखला येथे दि. २० फेब्रुवारी रोजी चिखला (काकड) गावात छत्रपती शिवरायांचा पुतळा हटविण्याच्या वादातून महिलांवर झालेली मारहाण ही अत्यंत गंभीर, संतापजनक आणि निषेधार्ह घटना आहे. या प्रकाराचा माजी आमदार डॉ शशिकांत खेडेकर यांनी तीव्र शब्दांत निषेध केला आहे
घटनेनंतर त्यांनी स्वतः तात्काळ घटनास्थळी जाऊन पीडित भगिनींची भेट घेतली. त्यांच्या डोळ्यातील अश्रू आणि मनातील भीती पाहून मन व्यथित झाले. या भगिनींना न्याय मिळालाच पाहिजे, ही माझी ठाम भूमिका आहे.
प्रशासनाने या प्रकरणाची तात्काळ व निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी. कोणत्याही परिस्थितीत गुन्हेगारांना पाठीशी घातले जाणार नाही.
शिवरायांचा अपमान आणि स्त्रीवर अत्याचार कदापि सहन केला जाणार नाही.. असे माजी आमदार डॉ शशिकांत खेडेकर यांनी सांगितले आहे.



