ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

देऊळगाव राजा येथील संजय नगरमध्ये माकड आणि कुत्र्यांचा हैदोस

नागरिक भयभीत ; प्रशासनाचे दुर्लक्ष

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

 देऊळगाव राजा येथील प्रभाग क्रमांक 1 मधील संजय नगर परिसरात गेल्या काही दिवसांपासून मोकाट कुत्रे आणि माकडांनी उच्छाद मांडला असून, स्थानिक रहिवासी प्रचंड दहशतीखाली वावरत आहेत. लहान मुले, वृद्ध आणि महिलांना घराबाहेर पडणे कठीण झाले असून, पालिकेच्या आरोग्य विभागाने याकडे तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.

संजय नगर भागात माकडांच्या टोळ्यांनी घरांच्या छतावर आणि गच्चीवर ठाण मांडले आहे. घरावरील पत्र्यांचे नुकसान करणे, अंगणात वाळत घातलेले कपडे पळवणे आणि खाद्यपदार्थांवर डल्ला मारणे यांमुळे गृहिणी त्रस्त आहेत. अनेकदा ही माकडे आक्रमक होऊन नागरिकांच्या अंगावर धावून जात असल्याच्या घटनाही घडल्या आहेत.

दुसरीकडे, रात्रीच्या वेळी मोकाट कुत्र्यांचा उपद्रव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. गल्लीबोळातून जाणाऱ्या दुचाकीस्वारांच्या मागे लागणे आणि पादचाऱ्यांना चावा घेण्याच्या घटनांमुळे रात्रीच्या वेळी या परिसरातून फिरणे धोक्याचे झाले आहे. कुत्र्यांच्या सततच्या भुंकण्यामुळे नागरिकांची रात्रीची झोपही मोडत आहे.

नागरिकांचे म्हणणे:

संजय नगरमधील रहिवाशांनी सांगितले की, “आम्ही मुलांना एकटे खेळायला बाहेर सोडू शकत नाही. माकडे घरात घुसून नुकसान करतात, तर कुत्री रस्त्यावरून चालणाऱ्यांचा पाठलाग करतात. वारंवार तक्रार करूनही नगरपालिका किंवा संबंधित विभाग याकडे गांभीर्याने पाहत नाहीये.”

प्रशासनाकडून ठोस कारवाईची अपेक्षा करण्यात आली आहे.

शहरातील वाढत्या मोकाट जनावरांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पालिकेने तातडीने

पिंजरे लावून माकडांचा बंदोबस्त करावा.

मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्त साठी मोहीम प्रभावीपणे राबवावी.

नागरिकांच्या सुरक्षेसाठी या परिसरात गस्त वाढवावी.

प्रशासनाने या समस्येकडे वेळीच लक्ष दिले नाही, तर एखादी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता पालिका प्रशासन यावर काय पाऊल उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाने या भागाची पाहणी करून उपाययोजना कराव्यात.

नगरपरिषद प्रशासनाने आपली निष्क्रियता झटकून संजयनगरमधील या समस्येकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. अन्यथा, संतप्त नागरिक नगरपरिषदेवर धडक मोर्चा काढण्याच्या तयारीत आहेत. संजयनगरच्या जनतेला या श्वापदांच्या त्रासातून मुक्त करणे ही आता केवळ मागणी नसून तो त्यांचा हक्क आहे.

(राजेश इंगळे ता. अध्यक्ष रा. कॉ. शरद चंद्र पवार )

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये