देऊळगाव राजा येथे महेश नवमी उत्साहात साजरी
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
देऊळगाव राजा व सिंदखेड राजा तालुक्यातील माहेश्वरी समाजाच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रम घेऊन महेश नवमी 8 जुलै रोजी साजरी करण्यात आली ,यावेळी समाज बांधवांच्या वतीने शहरातून राजस्थानी भवन ते बालाजी मंदिर पर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी समाज बांधवांची मोठ्या प्रमाणात उपस्थित होती, शिव व पार्वती यांची झाकी आणि श्री महादेवाची पिंड वाहनात ठेवून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी भगवान शिवची भूमिका हेमांश बाहेती आणि देवी पार्वती ची भूमिका कुमारी अनन्या लढ्ढा यांनी केली होती,हे या मिरवणुकीत आकर्षण ठरले, श्री महादेव पिंडीचा जलाभिषेक व पूजन करण्यात आले.
त्यानंतर भगवान महेशजिंची आरती करून महाप्रसाद वाटप करण्यात आला. इयत्ता बारावी मध्ये उत्तीर्ण झालेले समाजातील विद्यार्थ्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला, यामध्ये वैष्णवी जगदीश बाहेती, चंचल विजय बाहेती, कृष्णा राजेश बाहेती या विद्यार्थिनींचा मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी व प्रमाणपत्र व भेट वस्तू देऊन सन्मान करण्यात आला, तसेच शहरातील वैद्यकीय क्षेत्रात प्रसिद्ध असलेले डॉक्टर अशोक काबरा यांची नात डॉ.अनया अमित काबरा हिने एमबीबीएस परीक्षा प्रथम श्रेणीत पास केल्या बद्दल तिचा सन्मान करण्यात आला, त्यानंतर समाज बांधवांच्या वतीने विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि मनोरंजनाचे खेळ घेण्यात आले ,मिरवणुकी दरम्यान सहभागी पुरुषांनी विशेष ड्रेस परिधान केला होता ,तसेच महिलांनी सुद्धा विशेष ड्रेस परिधान केल्याने हे या मिरवणुकीचे सुद्धा आकर्षण ठरले, प्रत्येकाच्या गळ्यामध्ये जय महेश असे लिहिलेले रुमाल खांद्यावर लावलेले दिसत होते.
दोन्हीं तालुक्यातील माहेश्वरी समाज बांधव सहकुटुंब मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते, दरम्यान महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली, कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी माहेश्वरी संघटनांच्या सदस्यांनी व महिला मंडळ च्या सदस्यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे संचलन शोभा दामोदर राठी तर आभार लता जुगलकिशोर हरकुट यांनी मानले.



