ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अनिष्ट रूढी-परंपरांना फाटा देत स्व. प्रकाश मोहारे यांना श्रद्धांजली

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

राजुरा : सामाजिक प्रबोधनाचा संदेश देत अनिष्ट रूढी-परंपरांना फाटा देऊन स्वर्गीय प्रकाश गजानन मोहारे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ श्रद्धांजली व गंगापूजन कार्यक्रम अत्यंत साधेपणाने व आध्यात्मिक वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमात ग्रामगीतेतील विचारांच्या माध्यमातून अंधश्रद्धा, अनावश्यक खर्च व सामाजिक कुप्रथांचा त्याग करून विवेकपूर्ण जीवन जगण्याचा संदेश देण्यात आला.

         कार्यक्रमाची सुरुवात ह.भ.प. रामप्रसाद बुटले महाराज यांच्या ग्रामगीता वाचनाने झाली. अध्यक्षस्थानी ग्रामगीताचार्य तथा उपजिल्हा प्रचारक मारोती सातपुते होते. यावेळी ह.भ.प. सद्गुरु शैलेशजी कावळे महाराज, भाऊजी पा. वैद्य (अध्यात्मिक तत्त्वज्ञान वक्ते), ह.भ.प. प्रभाकरजी लडके महाराज, प्रचारक अमरनाथ जिवतोडे (गुरुदेव सेवा मंडळ, धिडशी), सतीश देवाळकर (सचिव, गुरुदेव सेवा मंडळ, अंतरगाव), तालुका प्रचारक नानाजी देवाळकर तसेच प्रचारक राजेंद्र मालेकर (मोझरी) यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

       मान्यवरांनी आपल्या मनोगतात स्व. प्रकाश मोहारे यांच्या शांत, संयमी, सेवाभावी व सामाजिक कार्याबद्दलच्या जिव्हाळ्याच्या स्वभावाचे स्मरण केले. त्यांनी ग्रामगीतेतील विचार आत्मसात करून समाजात विवेक, समता, बंधुभाव व मानवतेची मूल्ये जोपासण्याचे आवाहन केले. मृत व्यक्तीच्या स्मरणार्थ दिखाऊपणा किंवा अवाजवी खर्च न करता समाजोपयोगी कार्य आणि आध्यात्मिक चिंतन हीच खरी श्रद्धांजली असल्याचे वक्त्यांनी सांगितले.

     कार्यक्रमात उपस्थितांनी स्व. प्रकाश मोहारे यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. यावेळी ग्रामगीतेतील ओव्या, प्रार्थना व सामूहिक चिंतनातून उपस्थितांना सामाजिक परिवर्तनाचा संदेश देण्यात आला.

         या कार्यक्रमाचे आयोजन नंदा मोहारे, प्रल्हाद मोहारे, मधूकर मोहारे, माझी प्राचार्य सुधाकर मोहारे, जोगेश्वर मोहारे, श्रीकांत मोहारे शुभम मोहारे, राजू मोहारे समस्त मोहारे परिवार व नातलग मंडळी यांनी केले.

       कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्धी प्रमुख देविदास वांढरे यांनी केले तर आभार जोगेश्वर मोहारे यांनी मानले.

       कार्यक्रमास परिसरातील ग्रामस्थ, गुरुदेव सेवा मंडळाचे पदाधिकारी, उपासक-उपासिका आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते व राष्ट्रवंदना घेऊन कार्यक्रमांची सांगता करण्यात आली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये