ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

संस्कारक्षम पिढी घडवण्यासाठी मूल्यशिक्षण आवश्यक _ उप शिक्षणाधिकारी मनोज गौरकर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

       संस्कारक्षम पिढी घडविण्यासाठी विद्यार्थ्यांना मूल्य शिक्षण देणे आवश्यक आहे केवळ शैक्षणिक ज्ञान पुरेसे नसून शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांमध्ये चांगले संस्कार नैतिक मूल्य सामाजिक जाणीव रुजविणे काळाची गरज आहे असे प्रतिपादन माननीय मनोज गौरकार उपशिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद चंद्रपूर यांनी केले पंचायत समिती कोरपना अंतर्गत इयत्ता 6 वी नवीन अभ्यासक्रम शिक्षक प्रशिक्षण पहिला टप्पा दिनांक 7 जुलै 2026 पासून महात्मा गांधी विद्यालय गडचांदूर येथे सुरू आहे या प्रशिक्षण वर्गाला दिनांक 8 जुलै 2026 रोजी माननीय मनोज गौरकार उपशिक्षणाधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर यांनी सदिच्छा भेट देऊन प्रशिक्षणाची पाहणी केली

         यावेळी त्यांनी उपस्थित प्रशिक्षणार्थांना नवीन अभ्यासक्रम प्रभावीपणे राबविण्याबाबत मार्गदर्शन केले विद्यार्थी केंद्रीत अध्यापन कृती आधारित शिक्षण मूल्याद्दिष्ट शिक्षण तसेच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासासाठी शिक्षकांनी सकारात्मक व नावीन्यपूर्ण अध्यापन पद्धतीचा अवलंब करावा असे त्यांनी सांगितले यावेळी चांगले संस्कारक्षम विद्यार्थी घडविण्यासाठी शिक्षकांनी मूल्य शिक्षणाचे धडे विद्यार्थ्यांना द्यावे विद्यार्थी हे शिक्षकांचे अनुकरण करतात शिक्षकांचा शब्द त्यांना प्रमाण शब्द असतो आणि म्हणून शिक्षकांनी स्वतःपासून सुरुवात करून विद्यार्थ्यासमोर एक आदर्श निर्माण करावा अशा प्रकारची अपेक्षा यावेळी त्यांनी व्यक्त केली. प्रशिक्षणात सहभागी सर्व शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत अभ्यासक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त केला

    प्रशिक्षणातील सर्व व्यवस्था पाहून माननीय मनोज गौरकार सर यांनी समाधान व्यक्त केले

      प्रशिक्षणात मार्गदर्शक म्हणून कुमारी मंगला उरकुडे विषय शिक्षक श्री प्रविण झाडे माध्यमिक शिक्षक, श्री नितीन लोहे विषय शिक्षक श्री अशोक सातपुते माध्यमिक शिक्षक हे सुलभक म्हणून काम पाहत आहे या प्रशिक्षणात तालुक्यामधील जिल्हा परिषद शाळा खाजगी अनुदानित शाळेतील 60 शिक्षक प्रशिक्षण घेत आहे. माननीय कल्याण जोगदंड गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती कोरपणा यांचे मार्गदर्शनाखाली श्री विकास भंडारवार साधन व्यक्ति गटसाधन केंद्र कोरपना हे या प्रशिक्षणाचे समन्वयक म्हणून जबाबदारी पार पाडत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये