ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भद्रावतीत अवैध रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर जप्त : वनविभागाची कारवाई

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

          वनपरिक्षेत्रातील अवैध रेती उत्खनन व वाहतुकीविरोधात वनविभागाने कारवाई करत एक ट्रॅक्टर व ट्रॉली जप्त केली आहे. ही कारवाई ७ जुलै रोजी रात्री सुमारे ११.४५ वाजताच्या सुमारास करण्यात आली.

गुप्त माहितीच्या आधारे वनविभागाच्या पथकाने मानोरा–तांडा मार्गावर सापळा रचला. यावेळी नाल्यातून अवैधरित्या रेतीचे उत्खनन करून वाहतूक करणारा युवो टेक 548 डीआय ट्रॅक्टर (क्र.MH-34-TC-165) व क्रमांक नसलेली ट्रॉली अडविण्यात आली.

वाहनचालकाकडे रेती उत्खनन व वाहतुकीसंबंधी आवश्यक परवानगी व कागदपत्रांची मागणी केली असता ती सादर करता आली नाही. त्यामुळे वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी ट्रॅक्टर व ट्रॉली जप्त करून वाहन मालकाविरुद्ध वनगुन्हा दाखल केला.

ही कारवाई विभागीय वन अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी के. डब्ल्यू. धानकुटे यांच्या नेतृत्वात करण्यात आली. या मोहिमेत क्षेत्र सहाय्यक, वनरक्षक व वनमजूर यांनी सहभाग घेतला.

वनविभागाने अवैध रेती उत्खनन व वाहतुकीविरोधातील कारवाया यापुढेही अधिक तीव्र करण्यात येणार असून, अशा प्रकारच्या बेकायदेशीर कृत्यांविरुद्ध शोधमोहीम सुरूच राहणार असल्याचे वनविभागाने स्पष्ट केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये