ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जनगणना 2027 मध्ये शिक्षकांना सहभागी करू नये

गोंडवाना विद्यापीठाचे जिल्हाधिकाऱ्यांना विनंती पत्र

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

  गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर्स असोसिएशनच्या वतीने गोंडवाना विद्यापीठ कार्यक्षेत्रातील महाविद्यालयीन शिक्षकांना जनगणना 2027 मध्ये सहभागी न करण्यासंदर्भातलि मागणी निवेदनाच्या माध्यमातून कुलगुरू डॉ.प्रशांत बोकारे यांचे कडे केली होती. या पार्श्वभूमीवर कुलगुरु महोदय यांचे आदेशानुसार विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.अनिल हिरेखन यांनी चंद्रपूर व गडचिरोली येथील जिल्हाधिकाऱ्यांना महाविद्यालयीन शिक्षकांना जनगणना -2027 मध्ये सहभागी न करण्यासंबंधी विद्यापीठातर्फे विनंती पत्र दिले आहे.

      जनगणना 2027 च्या कार्यात सहभागी होण्यासंदर्भात चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर ,बल्लारपूर व पोंभुर्णा व इतर अनेक महाविद्यालयीन शिक्षकांना स्थानिक प्रशासनाच्या वतीने जनगणनेत सहभागी होण्यासंदर्भात पत्रे पाठवण्यात आली होती या पार्श्वभूमीवर गोंडवांना विद्यापीठ संघटनेने पुढाकार घेतला असून त्यांच्या मागणीला यश आले आहे. जनगणना 2027 ही प्रदीर्घ चालणारी प्रक्रिया असल्यामुळे विद्यार्थ्यांचे अभ्यासक्रम पूर्ण करण्यात प्रचंड अडथळा निर्माण होईल , निवडणूक आणि इतर कारणामुळे विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षा आधीच विलंबाने सुरू झालेल्या आहेत आणि जनगणना 2027 मुळे दुसऱ्या सत्राच्या परीक्षेच्या वेळापत्रकावर थेट परिणाम होईल व यामुळे निकाल आणि पेपर मूल्यांकनास विलंब होईल आणि येणारे सत्र लांबणीवर पडेल याकडे यंग टीचर्स संघटनेने लक्ष वेधले होते.

         सद्यस्थितीत गोंडवाना कार्य क्षेत्रातील महाविद्यालये नॅक आणि नवीन शैक्षणिक धोरण या कार्यात व्यस्त आहे या महत्त्वाच्या प्रशासकीय व शैक्षणिक कार्यावर जनगणनेच्या ड्युटी मुळे थेट परिणाम होईल. त्याचप्रमाणे अनेक वर्षापासून पदभरती न झाल्यामुळे प्रत्येक महाविद्यालयामध्ये शिक्षकांची कमतरता आहे या सर्व तांत्रिक व शैक्षणिक बाबी लक्षात घेता विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होईल व त्यांच्या भविष्यात अनेक अडचणी निर्माण होईल या संदर्भात यंग टीचर संघटनेने कुलगुरूंना निवेदन केले होते.

या पार्श्वभूमीवर कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी तातडीची दखल घेऊन विद्यापीठाच्या वतीने महाविद्यालयीन शिक्षकांना जनगणना 2027 प्रक्रियेत सहभागी न करण्यासंदर्भात चंद्रपूर व गडचिरोली येथील जिल्हाधिकाऱ्यांना विनंती पत्र दिले आहे. या संदर्भात संघटनेचे अध्यक्ष डॉ. संजय गोरे, सचिव विवेक गोरलावार व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी विद्यापीठ प्रशासनाचे आभार मानले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये