वर्धा जिल्हा विभागातर्फे आरोग्य व नशामुक्त अभियान राबविले
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
वर्धा- जिल्हा आरोग्य विभागातर्फे नशा मुक्त अभियान नशा मुक्त अभियानांतर्गत राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम 01/08/ 2024 रोजी समाज कल्याण भवन वर्धा येथे जिल्हा मानसिक आरोग्य ब्रह्मकुमारी संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित करण्यात आला यावेळी व्यसनाधीन झालेले कर्मचारी रवी बघेल ग्रामीण रुग्णालय देवळी यांनी त्यांच्या व्यसनाधीनतेचे त्रास व दुःखद अनुभव सर्वांसमोर व्यक्त केले जीवनात व्यसनमुक्त झाल्या नंतर किती चांगले बदल झाले पदोन्नती सुद्धा झाली असे अनेक अनुभव त्यांनी सांगितले.
यावेळी डॉ. सचिन परब नशा मुक्ती भारत अभियान राष्ट्रीय समन्वय मुंबई डॉ. सचिन तडस जिल्हा शल्य चिकित्सक सामान्य रुग्णालय वर्धा शरद चव्हाण आयुक्त समाज कल्याण वर्धा डॉ. संजय गाठे जिल्हा सामान्य रुग्णालय वर्धा डॉ. सुदर्शन हरले मानसोपचार तज्ञ जिल्हा सामान्य रुग्णालय वर्धाडॉक्टर नम्रता सलोजा जिल्हा सल्लागार राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम जिल्हा सामान्य रुग्णालय वर्धा डॉ. माधुरी दीदी संचालिका राष्ट्रीय ब्रह्मकुमारीज यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सुदर्शन हरले यांनी केले कार्यक्रमाचे संचालन राजश्री येवले यांनी केले तर आभार प्रदर्शन राहुल बुचुंडे यांनी केले