पोलीस स्टेशन खरांगना हद्दीतील आरोपी MPDA मध्ये स्थानबद्ध !
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
वर्धा- जिल्ह्यातील खरांगना पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या आंजी (मोठी) या गावातील आरोपी अमोल नामदेवराव भोकटे वय 37 वर्ष वार्ड नंबर दोन आंजी मोठी तालुका वर्धा जिल्हा वर्धा या आरोपीस मा. जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी श्री राहूल कर्डिले वर्धा यांच्या आदेशावरून स्थानबध्द प्रस्ताव क्रमांक 01/ 2024 कलम 3 MPDA अन्वये 01 वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचा आदेश पारित करण्यात आला. सदर आरोपीस दिनांक 7 /8/24 रोजी एक वर्षासाठी नागपूर जेलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
सदर आरोपी विरुद्ध 22 गुन्हे दारूबंदी कायद्यान्वये दाखल होते. पोलीस अधीक्षक नुरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक डॉ सागर कवडे, सहायक पोलिस अधीक्षक राहुल चव्हाण यांच्या मार्गदर्शनात सदाशिव ढाकणे ठाणेदार पोलीस स्टेशन खरांगना , पोलीस नाईक धीरज मिसाळ यांनी MPDA अंतर्गत प्रस्ताव तयार करून पाठवला होता. LCB मधील पो हवालदार संजय खल्लारकर यांनी सदर कारवाईत वेळोवेळी महत्त्वाची भूमिका बजावून जिल्हा दंडाधिकारी कार्यालयात पाठपुरावा केला.
 
					 
					 
					 
					 
					


