आसोला चक येथील इसमावर हल्ला करणारा बिबट झाला जेरबंद
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा.शेखर प्यारमवार
सावली तालुक्यातील पाथरी बीटात येत असलेल्या असोला चक येथे गुरुवार रोजी सकाळच्या सुमारास बिबट जेरबंद झाला, वन विभागाने लावून ठेवलेल्या पिंजऱ्यात बिबट अडकल्याची बातमी वाऱ्यासारखी परिसरात पसरताच नागरिकांनी बिबट्याला पाहण्यास तुफान गर्दी केली होती.
जंगलात वास्तव्यास असणारे हिस्त्र प्राणी आता भक्ष्याच्या शोधात मानवी वस्तीकडे येऊन मनुष्यावर हल्ला होताना बघावयास मिळत आहेत नुकतेच पंधरा दिवसांपूर्वी पालेबारसा येथे दुपारच्या सुमारास बिबट्याने घरात शिरून चार व्यक्तींना जखमी केले होते ही घटना ताजी असतानाच आसोला चक येथील श्रावण मेश्राम यांच्यावर बिबट्याने मंगळवार रोजी हल्ला चढवून जखमी केले होते त्यामुळे गावात भीतीचे वातावरण पसरले असल्याने वन विभागाने पिंजरे लावून ठेवले असता गुरुवारला सकाळचा सुमारास बिबाट जेरबंद झाला.
बिबट जेरबंद होताच बिबट्याचा दहशतीत असणाऱ्या गावकऱ्यांनी सुटकेच्या श्वास सोडला बिबट जेरबंद झाल्याची माहिती वनविभागास होतास विनोद धुर्वे वनपरिक्षेत्र अधिकारी सावली, एन. बी. पाटील सहाय्यक वनपरिक्षेत्र अधिकारी पाथरी, के.एन.गोडसेलवार, एस. टी. चुधरी, वाय.डब्लु.पोइनकर. यानी घटनास्थळावरून बिबट्यास जेरबंद करुन दुसरीकडे स्थलांतरीत केले.