ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राजुरा मुक्ती संग्राम स्मारक निर्माण करा

आमदार सुभाष धोटेंची राज्य विधिमंडळात सरकारकडे मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

 मराठवाडा मुक्ती संग्राम स्मारक ज्या पद्धतीने मराठवाड्यात निर्माण करण्यात आले आहे त्याच धर्तीवर मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाला यावर्षी ७५ वर्ष पूर्ण होत आहेत. त्यामुळे राजुरा येथे राजुरा मुक्ती संग्राम स्मारक निर्माण करण्यात यावे, त्यासाठी आवश्यक सुविधा व निधी उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी आमदार सुभाष धोटे यांनी राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात सरकारकडे केली आहे.

ज्या प्रमाणे मराठवाडा हा हैदराबाद च्या निजामशाही अंतर्गत येत होता त्याप्रमाणे राजुरा आणि परिसर हा सुद्धा निजामशाहीच्या अधिपत्याखाली येत होतो. जो लढा मराठवाडा मुक्ती संग्राम म्हणून लढल्या गेला. तसाच लढा मराठवाडा मुक्ती संग्राम अंतर्गत राजुरा येथे ही लढल्या गेला. यात राजुरा येथील अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी योगदान दिले. त्यामुळे मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाला ७५ वर्ष होत असल्याने या स्वातंत्र्य लढ्याचा जाज्वल्य इतिहास येणाऱ्या पिढीला प्रेरणादायी ठरेल असे तेजस्वी स्मारक राजुरा येथे निर्माण करण्यात यावे अशी मागणी आमदार सुभाष धोटे यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये