ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

श्री जगन्नाथ बाबा विद्यालय वायगाव (तु) येथे माजी विद्यार्थी स्नेह मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

          विद्यार्थी कितीही मोठे झाली तरी आपली शाळा, महाविद्यालय आणि तेथील आठवणी नेहमीच मनात घर करून असतात याचाच प्रत्यय वायगाव (तु) येथील श्री जगन्नाथ बाबा विद्यालय येथील माजी विद्यार्थी स्नेह मेळाव्यात आला. अनेक विद्यार्थी लांबून येऊन आठवणीत रमलेले दिसले. श्री जगन्नाथ बाबा विद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा मोठ्या उत्साहात 30 एप्रिल 2024 रोजी पार पडला. त्यानिमित्त एकत्र जमलेले सर्व माजी विद्यार्थी आठवणीत हरवून गेले होते.

     कार्यक्रमाचे उदघाटन संस्थेचे सचिव श्री सुरजकुमार बोबडे यांनी केले तर अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री नंदकिशोर धानोरकर सर होते व प्रमुख अतिथी म्हणून श्री मोते सर, श्री सतीश मडावी सर, सेवानिवृत्त शिक्षक श्री महादेव मडावी सर, श्री पांडुरंग कुरेकर सर, श्री तुराणकर सर, श्री बारेकर सर हे उपस्थित होते.या कार्यक्रमाची सुरुवात जिल्हा परिषद शाळेतील मुलींच्या नृत्याने करण्यात आली.अविनाश टोंगे सर,खुशाल पाटील सर, मंगेश बोढाले सर, रमेश करमणकर सर, अमृत ताजने सर, मेश्राम सर या शिक्षकांचा याप्रसंगी सन्मानचिन्ह, श्रीफळ व ग्रामगीता देऊन विशेष सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी विद्यार्थी विशाल कुरेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्यामदेव काकडे यांनी केले, तसेच सूत्रसंचालनाची जबाबदारी मंगेश मेश्राम यांनी पार पाडली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अमोल गराटे, स्वप्निल वानखेडे, राजू जेंगठे, निकेश कुरेकर श्री जगन्नाथ बाबा विद्यालयातील शिक्षक वृंद व सर्व आजी-माजी विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये