ताज्या घडामोडी

कर्मचाऱ्यांच्या आक्रोषासमोर बिल्ट प्रशासन नरमले – कामगारांच्या मागण्या मान्य केल्याची घोषणा

मृतकाच्या परिवारासह कामगारांनी केले तीन तास आंदोलन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी

मुन्ना खेडकर बल्लारपूर

14 सप्टेंबर रोजी बल्लारपूर पेपर इंडस्ट्रीत सकाळ पाळीत काम करीत असताना दिगंबर महाजन मध्ये  नामक कर्मचारी रसायन मिश्रित गरम पाण्यात पडून भाजला गेला होता. त्याचेवर चंद्रपूर व नागपूर येथे मिल द्वारे उपचार करण्यात आला पण तो अखेर 25 सप्टेंबर रोजी त्याचा मृत्यू झाला. सहकारी कामगार प्रशासन तसेच सुरक्षा अधिकाऱ्यांच्या बेपर्वाईने आघातग्रस्त होऊन अखेरीस मृत्यूमुखी पडल्याने सर्व कामगार संतप्त झाले व त्यांनी सुरक्षा अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदविण्याची जोरदार मागणी केली.

काल सायंकाळी 6:00 वाजताच्या दरम्यान नागपुर येथुन मृतक दिगंबरचे शव बल्लारपूर येथे पोहचताच कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कुटुंबीयांसह तीन एक्का गेट समोर  मृतदेहासह विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू करून मागण्या मान्य होईपर्यंत मृतदेह हलवणार नसल्याची भुमिका घेतली. अखेरीस बिल्ट प्रशासन 3 तासांनी शुद्धीवर आले व त्यांनी मृतक दिगंबर महाजनच्या पत्नीला नोकरी, पी एफ, ग्राज्युईटी वगळून  परिवाराला 23 लाख रुपयांचे अर्थसहाय्य, लहान मुलांना वयाच्या 18 वर्षांपर्यंत पेंशन, 10 वी पर्यंत मोफत शिक्षण अशा मागण्या मान्य केल्यानंतर शव तिन एक्का गेट समोरून हलविण्यात आले.

मागण्यांसंदर्भात झालेल्या बैठकीस बिल्ट व्यवस्थापनाच्या वतीने प्रवीण शंकेर (GM) (मानव संसाधन), तर प्रशासनाच्या वतीने उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, ठाणेदार, पेपर मिल मजदूर सभा सर्व पदाधिकारी, आम आदमी पार्टी चे सुरज ठाकरे, पापा आर्य, अजय दुबे, मेघा भाले, हयांचेसह मृतकाच्या परिवारातील सदस्य उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये