ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बामणी प्रोटीनचा कामगारांवार आली उपासमारीची वेळ

तथाकथित पर्यावरणवादीचा तक्रारीवरून म.प्र. नियमक मंडळने ताळेबंद करण्याचे निर्देश - कामगार युनियनचा आरोप

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. मुन्ना खेडकर

बल्लारपूर – शहराचा जवळच असलेल्या बामणी प्रोटीन प्रा, ली.हड्डी फॅक्टरी ला दि,13 मार्च 2024रोजी चंद्रपूर येथील तथाकथित पर्यावरणवादी राजेश बेले यांचा प्रदूषण विषयक तक्रारी वरून महाराष्ट्र प्रदूषण नियमक मंडळने हड्डी फॅक्टरीला ताळेबंद करण्याचे निर्देश दिले आणि फॅक्टरी बंद झाली.

प्रशासनाने कोणतेही प्रकारचे सहानिशा न करता कंपनी व्यवस्थापनाला कोणतेही संधी व कामगारांचा व त्यांचा परिवाराचा भविष्याचा कोणताही विचार न करता उद्योग बंद करण्या संबधीच्या सूचना कंपनी व्यवस्थपणास दिल्या. त्यामुळे कंपनी मधील स्थायी अस्थायी स्वरूपातील जवळपास 500 कामगारांना व त्याचा परिवारावर उपासमारीची पाळी आली आहे.

कामगारांचा मुलाबाळाचा शिक्षणाचा, उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. मागील 25ते 30वर्षा पासून सर्व कामगार काम करीत आहोत कामगारांना कुठल्याही प्रकारची अडचण काम करताना आली नाही. कंपनी बंद झाल्याने कामगारांवार आज दुर्भाग्याने उपासमारीची पाळी आली आहे. प्रशासनाने उद्योगावर कारवाई करण्यापूर्वी तक्रार करत्याचा तक्रारीवर विचार करून प्रकरणाची सत्यता तपासून त्यानंतरच निर्णय अपेक्षित होते.

परंतु तसे झाले नाही म्हणून भारतीय केमिकल वर्कस युनियन या नात्याने पत्रकार परिषद मध्ये कामगारा विषयी बाजू माडण्याकरिता आणि या कारवाई मुळे होणाऱ्या नुकसानाचे स्वरूप भविष्यात भयानक होऊ शकते. प्रशासनाला सांगू इच्छितो की कंपनी बंद न करता कंपनी ला काही वेळ देऊन समस्यावर तोडगा काढून कामगार युनियन चे पदाधिकारी व कामगार यांना न्याय देण्याकरिता योग्य ती कारवाई करावी.

जिल्हात सर्वच ठिकाणी प्रदूषण आहे जिल्हातील सर्वच छोटे बडे कारखाने आहे कोळसा खाणी, पेपर उद्योग ctps, पाईप फॅक्टरी,midc, यांनाही प्रशासन यांनी पाहावे. जिल्हात सर्वच ठिकाणी बेरोजगार वाढला आहे काही फॅक्टरी बंद पडल्या आहे आणि ही पन फॅक्टरी बंद राहणार तर बेरोजगारी आणखी वाढणार याचा विचार करून फॅक्टरी लवकर चालू करावे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये