ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

घुग्घुस येथे धनोजे कुणबी समाजाची कार्यकारिणी स्थापन

चांदा ब्लास्ट

 धनोजे कुणबी समाज घुग्घुसतर्फे शनिवार दि. दिनांक 26/10/2024 रोजी झालेल्या बैठकीत 17 विविध विषयांवर सखोल चर्चा करून सोसायटीची कार्यकारिणी स्थापन करण्यात आली. या कार्यकारिणीत घुग्घुस ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच सुधाकर गणपतराव बांदूरकर यांची अध्यक्षपदी एकमताने तर घुग्घुस ग्रामपंचायतीचे माजी सदस्य शिवसजन भाऊराव गोहणे यांची सचिवपदी अनुमोदन करण्यात आले.

 धनोजे कुणबी समाज संघटनेची कार्यकारिणी निवडून अध्यक्षपद सुरेश धवस यांना देण्यात आले असून सभेचे ठिकाण विठ्ठल मंदिर देवस्थान घुग्घुस असल्याचे इतर समाजातील सदस्यांनी सांगितले. उपाध्यक्ष- संतोष प्रभाकर लोडे, कोषाध्यक्ष- त्र्यंबक दुशांत कोंगरे, सहसचिव- तुळशीदास बबन धवस, निमंत्रक- संजय महादेव भोंगले, सदस्य- सुधाकर नानाजी चिकनकर, सदस्य- सुरेश नानाजी ढवस, सदस्य- सचिन अशोक वर्हाटे, सदस्य- बाळा माशिरकर, सदस्य – मिथुन वामनराव खुटेमटे, सदस्य- मोहन नारायण बांदूरकर, सदस्य- चेतन देवराव बोबडे, सदस्य- प्रितम भोंगले, सदस्य- प्रेमानंद शामराव जोगी, सदस्य- महेश नामदेवराव गुंजेकर, सदस्य- अविनाश जयंतराव बोबडे यांना स्वीकृत करण्यात आले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये