भौतिकशास्त्र अभ्यासक्रमावरील एकदिवसीय कार्यशाळा उत्साहात संपन्न

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर:गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोलीच्या भौतिकशास्त्र अभ्यास मंडळ आणि सरदार पटेल महाविद्यालय, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने “Scope and Limitations of B.Sc. Semester V and Semester VI Physics Syllabus as per NEP-2020” या विषयावर एकदिवसीय विद्यापीठस्तरीय कार्यशाळेचे आयोजन सरदार पटेल महाविद्यालयातील अब्दुल शफी सभागृहात करण्यात आले.
कार्यशाळेचे उद्घाटन डॉ. रंजीत मंडल, प्राचार्य, नेताजी सुभाषचंद्र विज्ञान महाविद्यालय, मुलचेरा यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. भास्कर एम. बहिरवार, गुरुनानक विज्ञान महाविद्यालय, बल्लारपूर, तर अध्यक्षस्थानी सरदार पटेल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद एम. काटकर उपस्थित होते. व्यासपीठावर महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. एस. व्ही. मधमशेट्टीवार, डॉ. मोहन गिरिया, प्राचार्य, चिंतामणी कला व विज्ञान महाविद्यालय, गोंडपिंपरी, डॉ. संजय गवळी, विभागप्रमुख, भौतिकशास्त्र विभाग, डॉ. आंबेडकर महाविद्यालय, चंद्रपूर तसेच डॉ. पी. आर. मोहरकर, विभागप्रमुख, भौतिकशास्त्र विभाग, डॉ. खत्री महाविद्यालय, चंद्रपूर उपस्थित होते.गोंडवाना विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र अभ्यास मंडळाच्या अध्यक्षा डॉ. उर्वशी पी. माणिक यांनी कार्यशाळेच्या आयोजनात महत्त्वाची भूमिका बजावली आणि प्रास्ताविक केले.
कार्यशाळेच्या प्रांगणात शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीचा सन्मान करण्यात आला. या अंतर्गत भौतिकशास्त्र विषयात पीएच.डी. (Ph.D.) पदवी प्राप्त केलेल्या संशोधकांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच, डॉ. परितोष मिश्रा यांनी लिहिलेल्या ‘आयकेएस इन फिजिक्स’ (IKS in Physics) या नवीन पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते दिमाखात पार पडले.
कार्यशाळेत बी.एस्सी.च्या पाचव्या व सहाव्या सत्रातील भौतिकशास्त्राच्या अभ्यासक्रमाची व्याप्ती, मर्यादा तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० (NEP-2020) नुसार अभ्यासक्रमातील बदल यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. या कार्यशाळेत विविध महाविद्यालयाचे 50 प्राध्यापक उपस्थित होते.
तांत्रिक सत्राच्या अध्यक्षस्थानी डॉ. राजेश आर. खेराणी, श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय, राजुरा आणि डॉ. मोहन गिरिया, प्राचार्य, चिंतामणी कला व विज्ञान महाविद्यालय, गोंडपिंपरी होते. या सत्रात डॉ. पी. आर. मोहरकर, डॉ. संजय गवळी, डॉ. अजय डी. दहागावकर, डॉ. विशाल दुधे, डॉ. उर्वशी पी. माणिक आणि डॉ. छगन मुंगमोडे यांनी संसाधन व्यक्ती म्हणून मार्गदर्शन केले. सहभागी प्राध्यापकांनी तज्ज्ञांशी संवाद साधून अभ्यासक्रमाशी संबंधित प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली.
समारंभाचे यशस्वी सूत्रसंचालन डॉ. संजय पी. रामटेके यांनी केले, तर कार्यशाळेच्या शेवटी आभार प्रदर्शन डॉ. वर्षा सी. ठाकरे यांनी मानले. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी सरदार पटेल महाविद्यालयाच्या भौतिकशास्त्र विभागातील प्राध्यापक डॉ. परितोष मिश्रा, प्रणाली गोरघाटे, मिताली सरकार व स्नेहा सोमलकर व कर्मचाऱ्यांनी प्रमोद चोपणे, विनोद कुलटे, भाग्यश्री कुयटे व गुरुदास शेंडे परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांचे आभार मानण्यात आले.
सर्वोदय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अरविंद पोरेड्डीवार, कार्याध्यक्ष आ. किशोर जोरगेवार, उपाध्यक्ष सुदर्शन निमकर, सगुणा तलांडी, सचिव प्रशांत पोटदुखे, कोषाध्यक्ष संदीप गड्डमवार, सर्वोदय शिक्षण मंडळचे कार्यकारी सदस्य राकेश पटेल, शेख रमजान, सुरेश पोटदुखे, जीनेश पटेल यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.एम.काटकर व त्यांच्या चमूचे अभिनंदन केले



