ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

तंटामुक्ती समितीच्या अध्यक्ष पदी विजय उंदीरवाडे ची निवड

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा.शेखर प्यारमवार

सावली पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायत केरोडा ची ग्रामसभा नुकतीच पार पडला,या ग्रामसभेत महात्मा गांधी तटामुक्ती समितीच्या अध्यक्ष व सदस्यांची निवड करण्यात आली,यात अध्यक्ष पदी विजय उंदीरवाडे यांची बहुमताने निवड करण्यात आली.

      विजय उंदीरवाडे गेली अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात हिरहिरीने भाग घेत असतात,ते केरोडा ग्रामपंचायत चे माजी सदस्य होते ,तसेच ते यापुर्वी तंटामुक्ती समिती चे उपाध्यक्ष सुध्दा राहीलेले आहेत, गोर गरीब ,गरजवंताच्या मदतीस धावून जात असतात,केरोडा गावात सुध्दा त्याचे सर्व समाज घटकांशी मैत्रीचे व सलोख्याचे संबंध आहेत. यामुळे पुन्हा त्यांचे नाव तंटामुक्ती समिती अध्यक्षासाठी घेण्यात आले,आणि बहुमताने त्यांची अध्यक्ष पदी निवड करण्यात आली.

ग्रामपंचायत केरोडाची ग्रामसभा,सामाजिक कार्यकर्ते प्रशांत ढोलणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली, यावेळी प्रभारी सरपंच ओमप्रकाश ढोलणे, सह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विजय उंदीरवाडे यांच्या निवडीचे सामाजिक कार्यकर्ता प्रशांत ढोलणे, संकेत वड्डेलवार,प्रशांत चलाख,सौरव पिपरे,प्रणित येरमलवार,सुनिल चलाख,अंकुश सोदुलवार,अंकुश अंगडलवार, कैलाश सहारे,रेखा भैसारे आदींनी अभिनंदन केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये