ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

दाताळ्यात भिडेचा झाला विरोध ; झोडे यांना पोलिसांनी केली अटक

घोषणाबाजीने वातावरण दुमदुमले, राजू झोडेंसह अनेकांनी केले आज निदर्शने

चांदा ब्लास्ट
शहरातील अग्रसेन भवनात संभाजी भिडे यांची आज रविवारी बैठक होती.याची माहिती होताच उलगुलान संघटना, वंचित बहुजन आघाडी, भीम आर्मीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी संभाजी भिडे यांची सभा उधळून लावली, याच वेळी पोलिसांनी जवळपास १०० जणांना ताब्यात घेतले व सुटका केली.यावेळी कार्यकर्त्यांनी संभाजी भिडे विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
संभाजी भिडे हे नेहमीच वादग्रस्त वक्तव्य करत असून नुकतेच महाराष्ट्र व संपूर्ण भारताची बदनामी केली. संभाजी भिडे हे देशद्रोही असून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी देशभरातून होत आहे.दरम्यान चंद्रपूर शहरातील अग्रसेन भवनात संभाजी भिडे यांची आज रविवारी बैठक होती.याची माहिती होताच उलगुलान संघटना, वंचित बहुजन आघाडी, भीम आर्मीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अग्रसेन भवन परिसरात जाऊन जोरदार घोषणाबाजी करत भिडे यांची सभा उधळून लावली.त्यानंतर चंद्रपूर पोलिसांनी जवळपास १०० जणांना ताब्यात घेतले व सुटका केली आहे.यावेळी उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे, जयदीप खोब्रागडे सदानंद करमनकर यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये