Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विवेक बोढे यांची वेकोलिच्या अधिकाऱ्यांसह तलावाचे खोलीकरण व सौंदर्यीकरणाची पाहाणी 

ढिवर-भोई समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव कटीबद्ध : विवेक बोढे 

चांदा ब्लास्ट

घुग्घुस : भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे यांनी वेकोलिचे उप प्रबंधक रोहित मेश्राम, एसओ (सिव्हिल) ब्रिजकिशोर मीना यांच्यासह शुक्रवार, १३ सप्टेंबर रोजी सायंकाळी वेकोलिच्या मोठया तलावाचे खोलीकरण व सौंदर्यीकरण करण्यासाठी पाहाणी केली.

जिओसी बंकरच्या बाजूला वेकोलिचा मोठा तलाव आहे. हा तलाव शहरासाठी पाण्याचा मोठा स्रोत आहे. वेकोलिच्या ओव्हर बर्डनमुळे हा तलाव उथळ झाला आहे. ओबी मुळे तलावाचा आकार लहान झाला आहे. अगोदर कोळी समाज बांधव या तलावात मोठया प्रमाणात मासेमारी करायचे परंतु पाणी घाण असल्यामुळे मासेमारी व्यवसाय ठप्प झाला आहे.

वेकोलिच्या मोठ्या तलावाचे खोलीकरण व सौंदर्यीकरण करण्यासाठी आणि कोळी समाज बांधवांना रोजगार मिळावा यासाठी ना. सुधीर मुनगंटीवार व जि. प. चे माजी अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी वेकोलिकडे पाठपुरावा केला होता. तसेच भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे यांनी वेळोवेळी निवेदनातून मागणी केली होती.

अखेर भाजपा जिल्हामहामंत्री विवेक बोढे यांच्या मागणीला यश आले. तलावाचे खोलीकरण व सौंदर्यीकरण वेकोलितर्फे करण्यात येणार आहे ढिवर-भोई समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव भाजपा कटीबद्ध आहे, याठिकाणी चंद्रपूरच्या रामाळा तलावा सारखे सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे असे भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे यांनी सांगितले.

याप्रसंगी आई एकविरा मासेमारी भोई ढिवर समाज संस्थेतर्फे वेकोलिच्या तलावामध्ये मासेमारी करीता परवानगी देण्याचे निवेदन देण्यात आहे.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष दीपक कामतवार, उपाध्यक्ष रोशन पचारे, मारोती मांढरे, सचिव अमोल नागपुरे, सहसचिव दिलीप मांढरे, कोषाध्यक्ष विजय कामतवार, भाजपाचे अमोल थेरे, बबलू सातपुते, विवेक तिवारी, सतीश बोन्डे, शरद गेडाम, शरद कामतवार, रतन शिंदे, नागेश नागपुरे, नंदकिशोर कामतवार, परमेश्वर कामतवार, प्रल्हाद नागपुरे, संदीप कामतवार, मंगेश कामतवार, रोहन मांढरे, भोला कामतवार, शंकर शिवरकर उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये