Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अल्ट्राटेक कंपनी समोरील मुख्य रस्त्याची साफसफाई तसेच रोड चे बाजूला वृक्ष लागवट करा 

भाजपा शहर अध्यक्ष डोहे यांची अल्ट्राटेक सिमेंट कंपनी व्यवस्थापकांकडे मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

गडचांदुर – गडचांदुर शहराचे पायथ्याशी असलेले पूर्वीची माणिकगड सिमेंट तर आताची अल्ट्राटेक सिमेंट उद्योग असून आजपर्यंत गडचांदुर शहराला कंपनी कडून पाहिजे त्या प्रमाणात सहकार्य लाभले नाही.नेहमी प्रदुषण बाबत जनता ओरड असतात परंतु त्यावर कंपनिच्या व्यवस्थापकाला काहीही परिणाम पडलेला नाही. एवढेच नाही तर कंपनीत वाहतूक करणाऱ्या खाजगी वाहनां करीता पुरेशी पार्किंग ची जागा उपलब्ध करू शकले नाही व गडचांदुर शहरातील मुख्य रस्त्यावर नेहमी मोठ्या संख्येत गाडया उभा काम चालवीत होते.व त्यामुळे त्या ठिकाणाहून ये- जा करताना नागरिकांना जीव मुठीत घेवून जावे लागत होते.हे लक्ष्यात घेता नवनिर्वाचीत भाजपा शहर अध्यक्ष यांनी स्वतः पुढाकार घेवून आंदोलन केले.असता लगेच सदरच्या गाडया विरुध्द कार्यवाही करून नो पार्कींग झोन मोकळे केले.तेव्हा पासून सदरच्या रस्त्यावर कोणतीही गाडी उभी असताना दिसत नाही.मात्र या रोड वरून कंपनीच्या गाड्याची मोठी वर्दळ असते त्यामुळे या रोड वर वाहन ये जा करताना डस्ट उडुन ये जा करणाऱ्या नागरिकांच्या तोंडा वाटे शरीरात जातात व त्यापासून नागरिकांना त्वचेचा, डोळ्याच्या, श्वासाचा , किडनीचा असे विविध आजार होत आहे.आधीच कंपनीचे मोठया प्रमाणात प्रदुषण असताना या रोड च्या धुळीचा भर पडत आहे.त्यामुळे नवनियुक्त भाजपाचे शहर अध्यक्ष अरविंद डोहे यांनी आज अल्ट्राटेक सिनेंट कंपनीचे व्यवस्थापक श्री नवीन कौशिक यांना सदरच्या रस्त्याची नियमित साफसफाई ची जबाबदारी घ्या व रोडचे बाजूला वृक्ष लागवड करा अशी विनंती केली असून ते त्यांनी मान्य करीत लवकरच कामाला सुरुवात करण्याचे आश्वासन दिले.

परंतु कंपनीने दिलेले आश्वासन पूर्ण करतील काय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये