Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

“वर्धा शहर परीसरात मोहा दारू भट्टीवर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कार्यवाही”

संपूर्ण मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

दि. 13/09/24 रोजी स्थानिक गुन्हे शाखा जिल्हा वर्धा चे पथक पोलीस स्टेशन वर्धा शहर परीसरात अवैध धंद्यावर कार्यवाही करणेकरीता पेट्रोलिंग करीत असतांना, त्यांना मिळालेल्या गोपणीय माहितीच्या आधारे अशोक नगर वर्धा येथे आरोपी बेलाबाई महिंद्र राखडे हिचे राहते घरी दारूबंदीबाबत प्रो.रेड केला असता, यातील आरोपीता हि तिचे साथीदारासह तिचे राहते घराचे स्लॅबवर मोहा दारूची भट्टी लावुन मोहा दारू निर्मीती करीत असतांना मोक्कावर रंगेहाथ मिळुन आल्याने, जप्ती पंचनामा कार्यवाही करून, आरोपीतांचे ताब्यातुन 1) 15 लोखंडी व प्लास्टीक ड्रममध्ये अंदाजे 2,500 ली. मोहा सड़वा रसायण कि 2,00,000 रु, 2) 04 प्लास्टीक डबक्यांमध्ये अंदाजे 60 ली. गावठी मोहा दारू कि 9,000 रू व इतर भट्टी साहित्यासह जु.कि. 2,27,900 रू चा मुद्देमाल जप्त करून, आरोपी नामे 1) बेलाबाई महिंद्र राखडे, वय 30 वर्ष, रा. अशोक नगर वर्धा 2) मनोज नत्थुजी पैठे, वय 40 वर्ष, रा. पुलफैल लाला लजपतराव शाळाजवळ वर्धा यांचेवर पोलीस स्टेशन वर्धा शहर येथे दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

  सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक मा. श्री. अनुराग जैन सा., अपर पोलीस अधिक्षक मा. श्री. डॉ सागर कवडे सा., यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा जि. वर्धा चे पोलीस निरीक्षक मा.श्री. विनोद चौधरी सा. यांचे निर्देशाप्रमाणे, पो.अं. मनोज धात्रक, अरविंद येनुरकर, अभिषेक नाईक, विनोद कापसे, मुकेश ढोके सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये