Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राजुरा तालुका अध्यक्ष पदी संजय रामटेके

महाराष्ट्र पत्रकार संघ राजुरा तालुका कार्यकारणी घोषित

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. मुन्ना खेडकर

चंद्रपूर :- महाराष्ट्र पत्रकार संघांचे राज्य संघटक अध्यक्ष श्री विलासराव कोळेकर (राज्य अध्यक्ष)यांचा सूचनेनुसार चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष मुन्ना खेडकर यांनी राजुरा तालुका महाराष्ट्र पत्रकार संघाची नवीन कार्यकारणी घोषित करण्यात आली.

बल्लारपूर येथील सार्वजनिक बांधकाम विभाग गेस्ट हाऊस मध्ये जिल्हातील सर्व पदाधिकारी व सदयस समवेत बैठक घेऊन सर्वानुमते राजुरा तालुका अध्यक्ष पदी संजय दामोधर रामटेके, उपाध्यक्ष पदी ऍड, रामभाऊ पंढरीनाथ देवईकर. सचिवपदी रत्नाकर दिवाकर पायपरे,सहसचिव पदी जगतसिंग गुरुमीत सिंग वधावन. कार्याध्यक्ष पदी आदित्य विजय भाके सदयसपदी सुधाकर पर्लपेल्ली, अरुण आबाजी झाडें या सर्वाना सर्वानुमते निवड करण्यात आली अशी घोषणा चंद्रपूर जिल्हाचे अध्यक्ष मुन्ना खेडकर यांनी केली या वेळी महाराष्ट्र पत्रकार संघांचे राज्य सदयस पदमाकर पांढरे जिल्हा उपाध्यक्ष रमेश निषाद यांचा उपस्थित निवड करण्यात आली.महाराष्ट्र पत्रकार संघ राज्यातील प्रत्येक जिल्हात कार्यरत आहे पत्रकारांचा विविध समस्या सोडवण्या करिता कटिबद्ध आहे.

जनहितार्थ विविध उपक्रम राबवून संघा ला बळकट करून जोमाने काम करणार असे प्रतिपादन नवनियुक्त राजुरा तालुका अध्यक्ष संजय रामटेके व कार्याध्यक्ष आदित्य भाके यांनी स्पष्ट केले. यावेळी नवनियुक्त अध्यक्ष व पदाधिकारी यांना जिलाध्यक्ष यांनी पुष्पगुछ देऊन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. बैठक मध्ये आलेल्या सर्व पदाधिकारी व कार्यकारी सदयस यांनी सर्वांचे अभिनंदन करून पुढील वाटचाली करिता शुभेच्छा दिल्या.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये